शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: होम आयसोलेशनवरून केंद्र सरकारने राज्यांना झापले; नियम बदलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 08:58 IST

जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यास त्याला सर्रासपणे होम आयसोलेशन करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या १३ हजारांवर पोहोचल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठविले असून एकाही रुग्णाला होम आयसोलेशन न करण्याची सूचना केली आहे. 

जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यास त्याला सर्रासपणे होम आयसोलेशन करण्यात येत आहे. यामुळे कुटुंबातील सदस्य, शेजारच्या लोकांना कोरोना होण्याचा धोका वाढत आहे. खासकरून दाट वस्तींमध्ये हा धोका जाणवतो. यामुळे अशा भागातील रुग्णांना होम आयसोलेशन करू नये, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे. 

यासाठी आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हा रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहू शकतो का याची खात्री करावी. तसेच या रुग्णांवरील उपचारासाठी डॉक्टरांती विशेष टीम तैनात करावी, असे या पत्रात म्हटले आहे. शहरी भागांमध्ये दाट लोकवस्ती आहे. यामुळे या भागांत होम आयसोलेशनची परवागी देण्यात येऊ नये. असे केल्यास त्याचा कुटुंबातील सदस्यांसह शेजाऱ्यांना धोका उद्भवणार आहे. अशामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे, असे पत्रात म्हटले आहे. 

दिल्ली सरकार अडचणीतखासकरून दिल्ली सरकारला उद्देशून हे पत्र लिहिन्यात आले आहे. यामुळे दिल्लीमध्ये मोठे संकट उभे ठाकले आहे. दिल्लीमध्ये 10490 रुग्णांना होम आयसोलेट करण्यात आले आहे. या रुग्णांना कुठे ठेवावे असा प्रश्न आता दिल्ली सरकारला पडला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या निर्णयाला मनमानी कारभार असल्याचा आरोप केला असून कोरोनाविरोधातील लढ्यावर याचा गंभीर परिणाम होणार असल्याचे म्हटले आहे. 

दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी या पत्रानंतर तातडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांना होम आयसोलेशन बंद करण्याचे आदेश दिले. यामध्ये त्यांनी म्हटले की, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला पहिले पाच दिवस सक्तीचे सरकारी क्वारन्टाईन करावे लागणार आहे. यानंतरही जर त्याच्यामध्ये लक्षणे दिसली तर त्याचा कालावधी वाढविण्यात यावा. तसेच जर पाच दिवसांनंतर कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली तरच होम आयसोलेशन करण्यात यावे. परत त्याच्यामध्ये कोरोना आढळल्यास त्याला सरकारने केलेल्या उपचारांच्या सोईच्या ठिकाणी दाखल करण्यात यावे असे म्हटले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

भारताला मोठे यश! 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला वेग; अमेरिकेत अटक

आजचे राशीभविष्य - 20 जून 2020; मिथुन राशीच्या लोकांना आजार, अपघाताची शक्यता

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य