शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

CoronaVirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार १ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 16:47 IST

बैजल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्य सचिव, पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिस्थितीची माहिती घेतली आहे.

नवी दिल्ली: देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, भारताची राजधानी असलेल्या दिल्लीतही परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्य सचिव, पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिस्थितीची माहिती घेतली आहे. नायब राज्यपालांनी आरोग्य व्यवस्था, आयसोलेशन होत असलेल्या लोकांचा आढावा घेतला. त्यानंतर अरविंद केजरीवालांनी मोठी घोषणा केली आहे.कोरोनाग्रस्तांचा उपचार करताना कोणत्याही डॉक्टर, नर्स किंवा अन्य आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १ कोटींची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा निर्णय खासगी आणि सरकारी दोन्ही रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. नायब राज्यपालांनी दिल्लीतले कोरोनाच्या प्रादुर्भावाची महत्त्वाची ठिकाणं असलेल्या भागात फायर ब्रिगेडच्या मदतीनं जंतुनाशक फवारणी करण्यास सांगितली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनाही योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. १२०वर पोहोचला संक्रमितांचा आकडाराजधानीत कोरोना पीडितांचा आकडा १२०च्या वर  गेला आहे. दिल्लीत मंगळवारी २३ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२०वर  गेली आहे. देशभरात १५९० जण कोरोनानं संक्रमित आहेत. तर मृतांची संख्या ४७च्या घरात आहे. मंगळवारी दिल्लीतल्या मोहल्ला क्लिनिकमधल्या आणखी एका डॉक्टरला व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे उत्तर पूर्व दिल्लीतल्या लोकांना सेल्फ क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तसेच दिल्लीत संभाव्य कोरोनाग्रस्तांची संख्या ८०० ते १००० पर्यंत वाढू शकते, असंही सांगितलं जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल