शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: घरी सोडण्याची मागणी करणाऱ्या मजुरांना पोलीस अधिकाऱ्याची लाथेनं मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 13:28 IST

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; मजुरांना मारहाण करणारा पोलीस अधिकारी निलंबित

बंगळुरू: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बऱ्याच दिवसांपासून ठप्प होती. आता काही प्रमाणात रेल्वे सेवा सुरू झाल्यानं देशभरात अडकलेले मजूर त्यांच्या घरी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. हाती काम नसल्यानं लाखो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आपापल्या गावी जाण्यासाठी मजूर हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. अशाच काही मजुरांची गर्दी बंगळुरुत झाली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं काही मजुरांना लाथेनं मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.घरी सोडण्याची मागणी करत काही मजूर बंगळुरूतल्या के. जी. हल्ली पोलीस ठाण्याजवळ जमले होते. आम्हाला उत्तर प्रदेशला सोडण्याची व्यवस्था करा. व्यवस्था होईपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पवित्रा मजुरांनी घेतली. या मजुरांना उपनिरीक्षक राजा साहेब यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मजूर त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे राजा साहेब संतापले. त्यांनी काही मजुरांच्या कानशिलात लगावली, तर काहींना लाथेनं मारहाण केली.  राजा साहेब यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राजा साहेब यांना निलंबित करण्यात आलं. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणी खाते अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी एस. डी. शरणप्पा यांनी दिली. तर दुसरीकडे बंगळुरूपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मालूर नागरी रुग्णालयातल्या एका डॉक्टरनं कोरोना चाचणीचे अहवाल देण्यासाठी मजुरांकडे लाच मागितली. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून संबंधित डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. देशाच्या विविध भागांत अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. पंतप्रधान मोदी आज रात्री देशवासीयांशी संवाद साधणार; मोठी घोषणा होणार?देशातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता; पण आता बरंच काही बदलणार?आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाललॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्राचिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या