शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Coronavirus News: मी मंत्री असल्यानं नियमाला अपवाद; मोदींच्या सहकाऱ्याचा क्वारंटिनला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 6:08 PM

विमानतळावरून मोदींच्या मंत्र्यानं थेट क्वारंटिन न होता थेट घर गाठलं

बंगळुरू: दिल्लीहून बंगळुरूला पोहोचलेले भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्युशनल क्वारंटिन) न राहता थेट घर गाठलं. सदानंद गौडा यांनी नियमानुसार हॉटेलमध्ये राहणं गरजेचं होतं. मात्र विमानतळावरून बाहेर पडताच गौडा थेट त्यांच्या गाडीत बसले. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानं ते होम क्वारंटिन राहणार असल्याची माहिती त्यांच्या सचिवानं दिली.क्वारंटाईनची नियमावली सर्व नागरिकांसाठी लागू आहे. पण त्यात काही जणांसाठी अपवाद करण्यात आल्याचा दावा गौडा यांनी नंतर माध्यमांशी संवाद साधताना केला. 'मी मंत्री असल्यानं राज्य आणि केंद्र सरकारनं काही अपवाद केले आहेत,' असं गौडा म्हणाले. माझ्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. केंद्राच्या औषध विभागाचा प्रमुख असल्यानं औषधांचा तुटवडा निर्माण होऊ न देण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचं गौडा म्हणाले. मी औषध पुरवठा केला नाही, तर रुग्णांची संख्या दुप्पट होईल, असंदेखील त्यांनी म्हटलं.सदानंद गौडा यांनी स्वत:ची तुलना अप्रत्यक्षपणे कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी केली. 'संपूर्ण देशात औषधांचा पुरवठा कायम राहील हे पाहण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. डॉक्टर, औषध पुरवठा करणाऱ्या क्वॉरंटिन झाल्यास आपण कोरोनाला कसं पराभूत करणार?,' असा सवाल त्यांनी विचारला.देशाच्या इतर राज्यांमधून विमानानं येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस इस्टिट्युशनल क्वॉरंटिन आणि त्यानंतर सात दिवस होम क्वॉरंटिन करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला आहे. यामधून काही जणांना वगळण्यात आलं आहे. मात्र त्यामध्ये मंत्र्यांचा समावेश असल्याचा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. आज देशांतर्गत हवाई वाहतुकीला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय मंत्र्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात अनेक मंत्री पॉझिटिव्ह आढळले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या