शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

CoronaVirus कोरोनाविरोधातील लढाईत बीसीजी लस बनणार भारतीयांची 'ढाल'; १९४९ पासून लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 20:03 IST

बीसीजी म्हणजे बेसिलस कामेट गुएरिन असे पूर्ण नाव आहे. ही लस श्वासोच्छवासाशी संबंधित आजारांवरील आहे. बीसीजी ही लस जन्मल्यानंतर सहा महिन्यांच्या काळामध्ये दिली जाते.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला पसरण्यापासून रोखण्यासाठी संशोधकांना एक नवीन आशेचा किरण दिसला आहे. भारतात गेल्या ७२ वर्षांपासून बीसीजीची लस लहान मुलांना टोचली जाते. आता जग या लसीला कोरोनाविरोधात लढण्यासाठी ढाल मानू लागले आहे. 

न्यूयॉर्क इंन्सि्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनच्या बायोमेडिकल सायन्स विभागाने केलेल्या एका अभ्यासामघ्ये अमेरिका आणि इटली सारख्या देशांमध्ये बीसीजी लसीकरण योजना नाहीय. यामुळे या देशांमधये कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. तसेच मृत्यूही होत आहेत. तर जपान आणि ब्राझिल देशांमध्ये या दोन्ही देशांच्या तुलनेत कोरोनाचे बळी कमी आहेत. 

बीसीजी म्हणजे बेसिलस कामेट गुएरिन असे पूर्ण नाव आहे. ही लस श्वासोच्छवासाशी संबंधित आजारांवरील आहे. बीसीजी ही लस जन्मल्यानंतर सहा महिन्यांच्या काळामध्ये दिली जाते. जगात या लसीचा पहिल्यांदा वापर १९२० मध्ये झाला होता. ब्राझीलसारख्या देशामध्ये या लसीचा वापर होत आहे. दिलासादेणारी बाब म्हणजे भारतातही ही लस नवजात बालकांना दिली जाते. या अभ्यासामध्ये असे आढळून आले की ही लस न देणाऱ्या देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये अमेरिका, लेबनॉन, नेदरलँड आणि बेल्जिअम हे देश आहेत. तर जपान, ब्राझील, चीन, भारत या देशांमध्ये ही लस दिली जाते. चीनमध्येच कोरोनाचा प्रसार सुरु झाल्याने चीनला अपवाद ठेवण्यात आले आहे. 

या अभ्यासामध्ये ज्या देशांमध्ये बीसीजी लस देण्यात येते त्या ठिकाणी कोरोनाचे बळी कमी आहेत. ज्या देशांमध्ये आधीपासून बीसीजी लस देण्यात येत आहे तिथे कोरोनाचा धोका दहा पटींनी कमी झालेला आहे. तर ईराणमध्ये १९८४ मध्ये ही लस देण्यास सुरुवात झाली यामुळे तिथे ३६ वर्षांखालील नागरिकांना ही लस दिलेली आहे. मात्र, वृद्धांना लस दिलेली नसल्याने त्या देशात कोरोनाचा धोका जास्त आहे. 

या अहवालामध्ये भारताचे नाव नसले तरीही हे निष्कर्ष भारतासाठी आनंदाचे आहेत. कारण बीसीजी लस भारतात १९४८ मध्ये देण्यास सुरुवात करण्यात आली होती. हा प्रायोगिक प्रयोग होता. मात्र, नंतर १९४९ पासून देशभरात शाळांमध्ये लसीकरण सुरु करण्यात आले. १९५१ पासून मोठ्या प्रमाणावर लसीकरण वाढविण्यात आले. तर राष्ट्रीय टीबी योजना सुरू झाली तेव्हा १९६२ पासून जन्मताच बीसीजी लस देण्यात येऊ लागली. हा विचार केल्यास भारतात मोठ्या लोकसंख्येला बीसीजी लस देण्यात आली आहे. सध्या जन्माला येणाऱ्या ९७ टक्के बालकांना ही लस दिली जाते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या