शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ऑटोमोबाइल कंपन्या आता बनवणार व्हेंटिलेटर्स; मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 15:08 IST

सध्या कोरोनाच्या रुग्णांसाठी १४ हजारांहून अधिक व्हेंटिलेटर देशातील विविध रुग्णालयांत उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आता ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स कंपन्यांना व्हेंटिलेटर्स तयार करण्यास सांगितले आहे.  भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडला पुढील दोन महिन्यांत स्थानिक उत्पादकांसह मिळून ३० हजार व्हेंटिलेटर तयार करायचे आहेत.

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आता ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स कंपन्यांना व्हेंटिलेटर्स तयार करण्यास सांगितले आहे. ऑटोमोबाइल कंपन्यांनी या दिशेनं कामाला सुरुवात केली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडला पुढील दोन महिन्यांत स्थानिक उत्पादकांसह मिळून ३० हजार व्हेंटिलेटर तयार करायचे आहेत. सध्या कोरोनाच्या रुग्णांसाठी १४ हजारांहून अधिक व्हेंटिलेटर देशातील विविध रुग्णालयांत उपलब्ध आहेत.नोएडाच्या Agva healthcareलाही महिन्याभरात १० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यास सांगण्यात आलं आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात या व्हेंटिलेटर्सच्या पुरवठ्याला सुरुवात होणार आहे. DRDOसुद्धा येत्या दोन आठवड्यांपासून २० हजार एन९९चे मास्क तयार करणार आहे. सध्या देशभरातील अनेक रुग्णालयांत ११ लाख ९५ हजार एन९५ मास्क उपलब्ध आहेत. दोन घरगुती उत्पादक कंपन्या प्रत्येक दिवशी ५० हजार एन९५ मास्क तयार करत आहेत. पुढच्या आठवड्यापर्यंत प्रत्येक दिवशी १ लाख मास्क तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. रेडक्रॉसने आज १० हजार पीपीई म्हणजेच वैयक्तिक संरक्षक उपकरणे दान केली आहेत. दक्षिण कोरियालाही २० लाख पीपीई देण्याचीही ऑर्डर दिली आहे. मारुती सुझुकी व्हेंटिलेटर आणि मास्क तयार करेलदेशातील आघाडीची कार निर्माता मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं (एमएसआयएल) देखील कोरोना विषाणूच्या साथीच्या विरुद्ध लढाईत सक्रिय सहभाग घेतला आहे. व्हेंटिलेटर, मास्क आणि इतर संरक्षक उपकरणे तयार करण्यासाठी कंपनीने इतर उत्पादकांशी करार केला आहे. AgVa हेल्थकेअर आणि मारुतीचं मिळून महिन्याला १० हजार व्हेंटिलेटर बनवण्याचे लक्ष्य आहे. व्हेंटिलेटरची टेक्नोलॉजी, परफॉर्मन्स आणि त्यासंबंधीचे इतर विषय उत्पादन, विक्रीची जबाबदारी AgVa हेल्थकेअरची असेल. व्हेंटिलेटर्स बनवण्यासाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांसाठी मारुती आपल्या सप्लायर्सचा वापर करणार आहे. व्हेंटिलेटर्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी फायनान्सची व्यवस्था आणि सर्व आवश्यक परवानग्या मिळवून देण्यासाठी मारुती सुझुकी मदत करणार आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या