शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : उत्तर प्रदेशात कोरोना तपासणी करण्यास गेलेल्या पथकावर पुन्हा हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 16:01 IST

कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे.

ठळक मुद्देमोरदाबाद जिल्ह्यातील या क्षेत्रातील एका व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला होताआज आरोग्य विभागाचे पथक या परिसरात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आले होतेया परिसरातील लोकांनी जमाव करून 108 मेडिकल ऍम्ब्युलन्सवर हल्ला केला

लखनौ - एकीकडे देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यातील नागफणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हाजी नेब परिसरात हा प्रकार घडला.  मोरदाबाद जिल्ह्यातील या क्षेत्रातील एका व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या मृत्यूनंतर आज आरोग्य विभागाचे पथक या परिसरात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आले होते. त्याचवेळी या पथकावर हल्ला करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

 माहितीनुसार या परिसरातील लोकांनी जमाव करून 108 मेडिकल ऍम्ब्युलन्सवर हल्ला केला. या हल्ल्यात ऍम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांसह डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, घटनास्थळावर अजून काही डॉक्टर अडकून पडले असल्याचे वृत्त आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना ऍम्ब्युलन्सचालकाने सांगितले की,  जमवातील काही लोकांनी वैद्यकीय पथक आणि पोलिसांवर दगडफेक केली. हे पथक कोरोनाच्या संशयित रुग्णांचा तपास करून नेण्यासाठी आले होते. हे पथक संशयिताला घेऊन जात असताना अचानक जमावाने ऍम्ब्युलन्सवर दगडफेक सुरू केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी