शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

'मुस्लिमांना बळीचा बकरा बनविणे, हे कोरोनावरील...', असदुद्दीन ओवेसींचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 13:39 IST

आतापर्यंत देशात ५१९४ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १४९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली :  जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. 

आतापर्यंत देशात ५१९४ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये अनेक अफवा पसवल्या जात आहेत. याला काही लोक सोशल मीडियावर विरोधही करत आहेत.

कोरोनावरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे(AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या टीकेपासून वाचण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे, असा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे की, "कोणत्याही योजनेशिवाय लागू केलेला लॉकडाऊन आणि कोरोनापासून नवे शिकाऊ असल्याप्रमाणे टीका टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.... भाजपाच्या प्रचारकांना माहीत पाहिजे की, ते व्हॉट्सअॅप फॉरवर्डच्या माध्यमातून कोरोनाव्हायरसला हरवू शकत नाहीत... मुस्लिमांना बळीचा बकरा बनवणे, हे कोरोना व्हायरसवरील औषध नाही किंवा हा उपलब्ध टेस्टिंगचा पर्याय होऊन शकत नाही..."

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचा संसर्ग एकूण ५१४९ लोकांना झाला आहे. तर १४९ लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय, देशातील कोरोना बाधित ४०२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, गेल्या २४ तासांत देशात ७७३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात एक हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात बुधवारी ६० नवे रुग्ण आढळले असून आतापर्यंत १०७८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये फक्त मुंबईत आज ४४ नवे रुग्ण सापडले आहेत.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा