शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपने केले ‘हॉटस्पॉट’चे अचूक भाकीत, ६५० ठिकाणांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 01:40 IST

आरोग्य सेतूमध्ये असलेल्या माहितीचे सिंड्रोमिक मॅपिंगच्या साह्याने विश्लेषण करून कोरोना विषाणूची बाधा झालेला एखादा रुग्ण कोणकोणत्या भागांत गेला असावा, याचाही शोध घेता येतो.

नवी दिल्ली : देशभरातील ‘कोविड-१९’ साथीच्या ६५० हॉटस्पॉटबद्दल आरोग्य सेतू अ‍ॅपने अचूक भाकीत वर्तविले आहे. शिवाय, हॉटस्पॉट बनण्याची शक्यता असलेल्या आणखी ३०० ठिकाणांबद्दलही या अ‍ॅपने अंदाज वर्तविला आहे.नीती आयोगाने ही माहिती जाहीर केली आहे. आरोग्य सेतू अ‍ॅपवर देशभरातील १० कोटी लोकांनी आपली नोंदणी केली आहे. या अ‍ॅपमध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तीचे राहण्याचे ठिकाण आणि इतर वैयक्तिक माहिती असते. ती मिळवणे कोणालाही शक्य असल्याचा आरोप मध्यंतरी करण्यात आला होता. हे अ‍ॅप केंद्र सरकारने विकसित केले आहे. आरोग्य सेतूमध्ये असलेल्या माहितीचे सिंड्रोमिक मॅपिंगच्या साह्याने विश्लेषण करून कोरोना विषाणूची बाधा झालेला एखादा रुग्ण कोणकोणत्या भागांत गेला असावा, याचाही शोध घेता येतो. त्यातूनच देशातील ६५० हॉटस्पॉटबद्दलचे अचूक भाकीत आरोग्य सेतू अ‍ॅपला वर्तविता आले. देशात १३ ते २० एप्रिल या कालावधित आरोग्य सेतूने १३० संभाव्य हॉटस्पॉटबद्दल केलेल्या भाकितानंतर, तेरा ते चौदा दिवसांतच आरोग्य खात्याने ती ठिकाणे हॉटस्पॉट असल्याचे घोषित केले. एखादे ठिकाण हॉटस्पॉट होऊ नये, म्हणूनही आरोग्य सेतू उपयोगी आहे असे नीती आयोगाने म्हटले आहे.वैयक्तिक वापरासाठी उपयुक्तमहाराष्ट्रामध्ये अठरा जिल्ह्यांत कोरोनाचे ६० हॉटस्पॉट आहेत. ‘आरोग्य सेतू’ हे अ‍ॅप प्रशासनापेक्षा एखाद्या व्यक्तीच्या वापरासाठी अधिक उपयुक्त आहे. आपल्यापासून नेमक्या किती अंतरावर बाधित व्यक्ती आहे, याची माहिती या अ‍ॅपद्वारे मिळू शकते. कोरोना विषाणूबद्दल राज्य व देशात नेमकी काय स्थिती आहे, याची माहिती प्रशासनाकडे असतेच. लॉकडाऊन संपल्यानंतरच्या दिवसांत आरोग्य सेतू अ‍ॅप अधिक उपयुक्त ठरणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत