शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

CoronaVirus: 'माश्यांमुळे कोरोना पसरत नाही'; अमिताभ बच्चन पडले तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 18:18 IST

CoronaVirus in Mumbai देशात गेल्या २४ तासांत ४२ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा सध्या ६४९ आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोना तिसऱ्या टप्प्यात न पोहोचण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे खूप प्रयत्न करत आहेत. यासाठी देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. कोरोनाबाबत अफवांचा बाजार उठलेला असताना आता केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने चक्क बॉलिवुडच्या शहेनशहालाच खोटे ठरविले आहे. महत्वाचे म्हणजे अमिताभ बच्चन यांनी कालच हा व्हिडीओ पोस्ट केला होता.

अर्थमंत्र्यांनी आज विशेष पॅकेजची घोषणा केल्यानंतर काही वेळाने आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात गेल्या २४ तासांत ४२ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा सध्या ६४९ आहे. यापैकी ६०६ रुग्ण हे भारतात राहिलेले आहेत. तर ४७ रुग्ण हे परदेशातून भारतात आलेले आहेत. देशात आतापर्यंत १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

याचवेळी अग्रवाल यांनी देशवासियांना सोशल डिस्टंसिन्गचे कडक पालन करण्य़ाचे आवाहन केले. तसेच सरकारला सहकार्य करून कोरोनाला हरविण्यास सांगितले आहे. ज्या वेगाने कोरोना पसरत आहे ही चिंतेची बाब आहे. हा आकडा शून्यावर आणण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी त्यांना माश्यांमुळे कोरोना व्हायरस पसरतो का, या अमिताभ बच्चन यांच्या व्हि़डीओवरून प्रश्न विचारला असता त्यांनी सरळ नाही असे उत्तर दिले. तसेच मी त्यांचे ट्विट पाहिलेले नाही. मात्र, एवढे जरूर सांगू शकतो की व्हायरसचे संक्रमण माश्यांमुळे होत नाही. 

काय म्हणाले होते अमिताभ बच्चन?अमिताभ यांनी म्हटले आहे की, चीनने केलेल्या संशोधनाचा हवाला देऊन हे ट्विट केले आहे. आपला संपूर्ण देश कोरोनाविरोधात झुंज देत असूूून चीनच्या संशोधनात दिसून आले आहे की, कोरोना विषाणू मानवी विष्ठेमध्ये कित्येक आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतो आणि विष्ठेवर बसलेली माशी जर फळे, भाज्या अथवा अन्य कोणत्याही खाण्यापिण्यासारख्या  पदार्थावर बसली तर ते दूषित होऊन कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, म्हणूनच उघड्यावर शौचास बसू नका आणि  शौचालयाचा वापर करा. आपल्या घरात सुरक्षित रहा, असे या ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओतून अमिताभ यांनी आवाहन केले होते.

 

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य