CoronaVirus News: कोरोनाच्या मागे हात धुवून लागणं महागणार; आता सॅनिटायझरच्या किमती वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 03:05 PM2020-07-15T15:05:34+5:302020-07-15T15:43:25+5:30

CoronaVirus News: सॅनिटायझरच्या किमती वाढणार; ऑथॉरटी ऑफ ऍडव्हान्स रुलिंगकडून स्पष्ट

CoronaVirus alcohol based hand sanitizers to attract 18 per cent gst says aar | CoronaVirus News: कोरोनाच्या मागे हात धुवून लागणं महागणार; आता सॅनिटायझरच्या किमती वाढणार

CoronaVirus News: कोरोनाच्या मागे हात धुवून लागणं महागणार; आता सॅनिटायझरच्या किमती वाढणार

Next

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या ९ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातो. साबण किंवा सॅनिटायझरनं हात धुतल्यास कोरोना विषाणूपासून बचाव होतो, असं तज्ज्ञ सांगतात. मात्र आता सॅनिटायझरच्या किमती महागणार आहेत. अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी लागणार असल्याचं ऑथॉरटी ऑफ ऍडव्हान्स रुलिंगनं (एएआर) म्हटलं आहे. 

गोव्यातल्या स्प्रिंगफिल्ड इंडिया डिस्टिलरीज कंपनीनं एक याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना एएआरनं अल्कोहोल असलेले सॅनिटायझर जीएसटीच्या १८ टक्क्यांच्या टप्प्यात येत असल्याचं म्हटलं. स्प्रिंगफिल्ड इंडिया डिस्टिलरीजनं सॅनिटायझरच्या वर्गीकरणात स्पष्टता यावी यासाठी एएआरच्या गोव्यातील पीठाकडे याचिका दाखल केली होती. आम्ही उत्पादन आणि पुरवठा करत असलेल्या सॅनिटायझरला जीएसटीमधून सूट मिळाली आहे का, अशी विचारणा कंपनीकडून करण्यात आली होती. त्यावर अल्कोहोलचा समावेश असलेल्या सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी लागणार असल्याचं एएआरनं सांगितलं.

'याचिकाकर्त्यांकडून उत्पादित सॅनिटायझर अल्कोहोलचा समावेश अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरच्या श्रेणीत होतो. त्याचं वर्गीकरण एचएसएन ३८०८ शीर्षकाखाली होतं. त्यामुळे त्यावर १८ टक्के जीएसटी लागेल. ग्राहकांशी संबंधित असलेल्या मंत्रालयानं हँड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत केला आहे. मात्र जीएसटीतून सूट देण्यात आलेल्या उत्पादनांची यादी वेगळी आहे,' असं एएआरनं स्पष्ट केलं. 

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला जगभरातल्या अनेक आरोग्य संघटनांनी दिला आहे. हात धुण्यासाठी अल्कोहोलचा समावेश असलेले सॅनिटायझर वापरण्याची सूचना डॉक्टरांकडूनही केली जात आहे. ६० टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरचा वापर करण्याची शिफारस करण्यात येते. मात्र या सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी लागणार असल्यानं त्यांची किंमत महागणार आहे.
 

Web Title: CoronaVirus alcohol based hand sanitizers to attract 18 per cent gst says aar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.