शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

CoronaVirus: अनर्थ टळला! एअर इंडियाचं विमान आकाशात असतानाच वैमानिक पॉझिटिव्ह निघाला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 15:53 IST

CoronaVirus: एअर इंडियाच्या छोट्याशा चुकीमुळे मोठी दुर्घटना घडली असती, पण सुदैवानं ती टळली आहे.  

नवी दिल्लीः एअर इंडियाच्या विमानानं शनिवारी सकाळी दिल्लीहून रशियासाठी उड्डाण घेतलं, पण उड्डाणादरम्यान विमानाला पुन्हा माघारी बोलवावं लागलं आहे. विमानातील वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि लागलीच विमानाला परत बोलवण्यात आलं. एअर इंडियाच्या छोट्याशा चुकीमुळे मोठी दुर्घटना घडली असती, पण सुदैवानं ती टळली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी क्रू मेंबरचा अहवाल पाहिला असता तो चुकून निगेटिव्ह असल्याचं अधिकाऱ्यांना वाटलं, पण दोन तासांनंतर पुन्हा एकदा तो अहवाल व्यवस्थित पाहिल्यानंतर वैमानिकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्यानंतर विमानाशी एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) मार्गे संपर्क साधण्यात आला आणि विमानाला परत आणावं लागलं. हे विमान रशियामध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशात घेऊन येणार होते. त्यामुळे फ्लाइटमध्ये फक्त क्रू मेंबर्स आणि वैमानिक होते.विमानाला माघारी बोलावण्याचा निरोप मिळाला, त्यावेळी ते उझबेकिस्तानच्या आकाशात होते. एअरबस ए -320 हे विमान 12 वाजून 30मिनिटांनी दिल्लीत परतलं आहे. नियमानुसार क्रू मेंबर्सना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आता या विमानाला सॅनिटाइज केलं जाणार आहे. रशियामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी दुसरं विमान पाठवण्यात येणार आहे. वंदे मातरम् मिशन अंतर्गत एअर इंडिया परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणत आहे. आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोक वेगवेगळ्या देशांकडून परत आले आहेत, तर दोन लाखांहून अधिक लोकांनी देशात परतण्यासाठी नोंदणी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या