शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

coronavirus: देशात 94 टक्के कोरोना रुग्ण झाले बरे, मृत्यूदर १.४५ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 07:00 IST

coronavirus: देशात कोरोना संसर्गातून ९२.५३ लाख लोक बरे झाले असून त्यांचे प्रमाण ९४.७४ टक्के आहे. गुरुवारी कोरोनाचे आणखी ३१,५२१ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ९७.६७ लाख झाली आहे. या रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गातून ९२.५३ लाख लोक बरे झाले असून त्यांचे प्रमाण ९४.७४ टक्के आहे. गुरुवारी कोरोनाचे आणखी ३१,५२१ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ९७.६७ लाख झाली आहे. या रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बरे झालेल्यांची संख्या ९२,५३,३०६ असून कोरोना रुग्णांचा आकडा ९७,६७,३७१ आहे.  गुरुवारी आणखी ४१२ जण या आजाराने मरण पावले असून बळींची एकूण संख्या १,४१,७७२ झाली  आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा ३,७२,२९३ असून ते प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ३.८१ टक्के आहे.  जगभरात ६ कोटी ९२ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी ४ कोटी ८० लाख रुग्ण बरे झाले असून १५ लाख ७६ हजार लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेत २४ तासांत  ३ हजार मृत्यू  अमेरिकेमधील कोरोनाचे थैमान वाढत असून तिथे बुधवारी या आजाराने तीन हजार बळी घेतले. या देशात १ कोटी ५८ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील ९२ लाख ३१ हजार रुग्ण बरे झाले. ब्राझिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ६७ लाख आहे. फायझरच्या लसीमुळे चार अमेरिकी स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर तात्पुरता दुष्परिणामवॉशिंग्टन : फायझरच्या कोरोना लसीच्या अमेरिकेतील मानवी चाचण्यांदरम्यान चार स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर तात्पुरता दुष्परिणाम (फेशियल पॅरालिसिस- बेल्स पालसी) झाला होता. त्यामुळे अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने या लसीच्या परिणामांवर अधिक बारीक लक्ष ठेवले आहे. अमेरिकेत या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबत विचार करण्यासाठी गुरुवारी तज्ज्ञ समितीची बैठक झाली. त्यात या सर्व बाबींवर बारकाईने चर्चा झाली.  स्पुटनिक लस घेणाऱ्यांनी दोन महिने सोडावे मद्यपानरशियाने बनविलेली स्पुटनिक व्ही लस टोचून घेणाऱ्यांनी किमान दोन महिने मद्यपान वर्ज्य करावे. मद्यामुळे कदाचित दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. या लसीचा पहिला डोस टोचून घेण्याच्या दोन आठवडे आधीपासून मद्यपान बंद करावे. त्यानंतर एकूण ४२ दिवस त्यांनी मद्याला स्पर्श करू नये, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.  गरीब देशांतील  अनेक जण राहणार लसीपासून वंचितकोरोना लसीच्या निर्मिती व पुरवठ्याबाबत श्रीमंत देशांनी सर्व सूत्रे आपल्या हातात ठेवली असून, त्यामुळे ७०हून अधिक गरीब देशांतील प्रत्येकी १० पैकी ९ जणांना पुढच्या वर्षी कोरोना लस उपलब्ध होणार नाही, असे दी पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स या संस्थेने म्हटले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना लसीच्या साठ्यापैकी ५३ टक्के साठा श्रीमंत देशांच्या ताब्यात आहे. ही लस तत्काळ खरेदी करण्यासाठी गरीब देश सक्षम नाहीत. अगोदर श्रीमंत देशच ही लस खरेदी करतील. त्यामुळे गरीब देशातील रुग्णांना लस मिळण्यासाठी वाट पहावी लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत