शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: २०२० मध्ये भारतात ८२ लाख लोकांचा मृत्यू, त्यापैकी एवढे कोरोनाबळी, धक्कादायक आकडेवारी समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 10:22 IST

Coronavirus In India: गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जगभरात कोट्यवधी लोकांचा बळी घेतला आहे. दरम्यान, कोरोनाकाळात भारतामध्ये नेमके किती मृत्यू झाले याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच दरम्यान एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

नवी दिल्ली -  गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जगभरात कोट्यवधी लोकांचा बळी घेतला आहे. दरम्यान, कोरोनाकाळात भारतामध्ये नेमके किती मृत्यू झाले याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच दरम्यान एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार २०२० मध्ये भारतात ८१.२ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. २०१९ च्या तुलनेत भारतात मृत्यूचे प्रमाण ६.२ टक्क्यांनी अधिक होते. २०१९ मध्ये भारतात ७६.४ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. २०२०२ मध्ये कोरोनामुळे भारतात १ लाख ४८ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर २०२१ मध्ये तब्बल ३ लाख ३२ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. रजिस्टर जनरल ऑफ इंडियाच्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०२० पासून आतापर्यंत कोरोनामुळे भारतात ५ लाख २३ हजार ८८९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाकाळात देशात मृत्यूंचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. तसेच २०१९ च्या ७६.४ लाखांवरून ते ८१.२ लाखांपर्यंत पोहोचल्याचे दिसले.

महाराष्ट्र, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि हरियाणा येथील मृत्यूचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये वाढलेले दिसले. या राज्यांमध्ये कोरोनामुळे बहुतांश मृत्यू झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या काळातील जन्मनोंदणीवरून देशातील जन्मदर घटल्याचे दिसून आले. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जन्मदरात २.४ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये भारतात २ कोटी ४८ लाख मुलांच्या जन्माची नोंद झाली होती. तर २०२० मध्ये २ कोटी ४२ लाख जन्मांची नोंद झाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार