शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

Coronavirus: खायला अन्न नाही मग ८ दिवसाच्या मुलीला दूध कसं पाजणार?; एका हतबल आईची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 16:02 IST

ही कहाणी फक्त एका महकची नाही तर तिच्या जवळच उभी असणारी बिहारच्या नवादा येथे राहणाऱ्या चांदराणीची परिस्थिती बिकट आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन वाढवला पण आम्ही जगायचं कसं?मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळआम्ही कोरोनापेक्षा भूकेनेच मरु, मजुरांनी मांडली व्यथा

नवी दिल्ली – देशभरात लॉकडाऊन वाढवल्यामुळे दिल्ली आणि परिसरात अडकलेल्या लाखो मजुरांचे हाल आणखी वाढले आहेत. या संकटाच्या काळात फसलेल्या या मजुरांना दिवसांतून एकवेळचं जेवणही मिळणं कठीण झालं आहे. कोरोनापेक्षा आम्ही भूकेनेच मरू अशी अवस्था या मजुरांनी मांडली आहे.

लॉकडाऊन काळात महक नावाच्या एका महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. हॉस्पिटलला जाण्यासाठी पैसे नाहीत किंवा वाहन व्यवस्थाही नाही. २२ वर्षाची महक आणि तिचा पती गोपाळ उत्तराखंड येथील नैनीतालच्या एका गावात राहतात. जुनी दिल्ली येथील टाऊनहॉल परिसरात एका इमारतीच्या बांधकामासाठी ते मजूर म्हणून काम करत होते. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व बंद पडलं. महकने सांगितलं की, दोन दिवसात एकावेळचं जेवण आमच्या नशिबात आहे. मुलीला पाहून वडिलांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाही. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना महक म्हणाली की, एका हातात मावेल एवढा भात खाल्ला आहे. दूध कसं येणार? मुलीला कसं जगवणार? असा आक्रोश आई महक व्यक्त करत आहे.

ही कहाणी फक्त एका महकची नाही तर तिच्या जवळच उभी असणारी बिहारच्या नवादा येथे राहणाऱ्या चांदराणीची परिस्थिती बिकट आहे. एका झोपडीत थोड्या प्रमाणात भात आहे त्यातूनच तिच्या ४ लहान मुलांची भूक मिटवायची आहे. ती करनालच्या एका भट्टीत पती मदनसह मजुरीचं काम करते. पायपीट करुन तीचं कुटुंब कसंतरी दिल्लीत पोहचलं आहे. याठिकाणी एका झोपडीत ती राहते.

दिल्ली सरकार सर्व रेशनकार्ड धारकांना रेशन देत आहे मात्र अनेक प्रवासी मजूर ज्यांच्याकडे दिल्लीचं रेशनकार्ड नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या मजुरांची नोंदणी करण्यासाठी वेबसाईट बनवण्यात आली मात्र तीन दिवसांपासून ती वेबसाईटही बंद पडली आहे. जुनी दिल्ली रेल्वे स्टेशन परिसरातील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या बिहारच्या सीवान जिल्ह्यातील शंकर कुमारने त्याच्या सहकाऱ्यासह खाली पाकीट दाखवत सांगितले की, पैसे संपले आहेत. रेशन पण संपत आलं आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली सरकारकडून एका शाळेत जेवण दिलं जात असल्याचं समजताच त्याठिकाणी जाण्यास निघालो. तेव्हा पोलिसांनी लाठी मारुन हाकलवून दिलं अशी व्यथा त्यांनी मांडली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या