शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ७८ टक्के महाराष्ट्रासह चार राज्यातील रुग्ण; मुंबई, दिल्लीला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 01:11 IST

गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३३९०  नवे रुग्ण देशात आढळले, तर १०३  जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ५६३४२ झाली आहे.

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या समृद्ध व दाट लोकसंख्या असलेल्या चार राज्यांमध्येच कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ७८ टक्के रुग्ण केवळ याच चार राज्यांत आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात व तामिळनाडूत दररोज नवे रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.

चारही राज्यांना व्यापारी व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्व असल्याने अर्थकारणही संकटात सापडले असून, आता त्यावर अर्थ मंत्रालयात बैठका सुरू आहेत. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे अन्य १३ राज्यांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही. गेल्या ७ ते १३ दिवसांमध्ये एकही नव्या कोरोनाबाधिताचे निदान न झाल्याने १८० जिल्ह्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.एम्सच्या संचालकांनी जुलै मध्यात भारतात रुग्णसंख्येत मोठी वाढ होणार असल्याचे भाकित वर्तवले असले तरी सद्यस्थितीत आपण ही वाढ रोखू शकू , असा विश्वास आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला. केवळ तीनच दिवसात १० हजार नव्या रुग्णांची भर पडल्याने आता केंद्र व राज्य सरकारची चिंता वाढली आहे.

मुंबईत कोरोनाचा कहर अद्याप आटोक्यात आला नाही. त्यामुळे फिजिकल डिस्टसिंग, संपर्क तपासणे, तात्काळ चाचणी करणे यावर भर द्यायला हवा, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सुचवले. मात्र एकही चूक संपूर्ण प्रयत्नांवर पाणी फेरेल, अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्र व गुजरातमधील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रात जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील, असेही ते म्हणाले.अनेक तज्ज्ञ, संस्थांनी भारतात कोरोना प्रसाराचा अभ्यास केला. काही अदांज वर्तवले. त्याचे विश्लेषण एका विशिष्ट स्थितीवर आधारीत आहे. सद्यस्थितीत हे सारे अदांज असले.गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३३९०  नवे रुग्ण देशात आढळले, तर १०३  जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या५६३४२ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र