शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गर्दी कमी करण्यासाठी ७००० कैद्यांना सोडणार? लवकरच निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 09:10 IST

Coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झारखंड जिल्ह्यातील गर्दी कमी करण्यासाठी सुमारे ७,००० कैद्यांना अंतरिम जामीन किंवा पॅरोल दिला जाऊ शकतो.

रांची (झारखंड) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झारखंड जिल्ह्यातील गर्दी कमी करण्यासाठी सुमारे ७,००० कैद्यांना अंतरिम जामीन किंवा पॅरोल दिला जाऊ शकतो. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांतर्गत हे पाऊल उचलले जात आहे.झारखंडचे पोलीस महानिरीक्षक (जेल) बीरेंद्र भूषण यांनी सांगितले की, जेलमधील गर्दी कमी करण्यासाठी विचाराधीन कैद्यांना अंतरिम जामिनावर किंवा पॅरोलवर सोडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यानुसार, ज्यांना कमाल सात वर्षांची शिक्षा दिली जाऊ शकते, अशा कैद्यांची यादी तयार करण्यासाठी आदेश जारी करण्यात आला होता. न्यायालयाने मंजुरी दिल्यास अशा ७००० कैद्यांना अंतरिम जामीन दिला जाऊ शकतो. असे झाल्यास जेलमध्ये क्षमतेऐवढे कैदी उरतील.झारखंडच्या ३० जेलमध्ये २१,०४६ कैदी आहेत. झारखंड उच्च न्यायालयाचे न्या. ए. के. सिंह, प्रधान सचिव (गृह) राजीव अरुण इक्का व आयजी जेल बीरेंद्र भूषण यांच्या उच्चस्तरीय समितीची १७ मे रोजी बैठक झाली होती व स्थितीचा आढावा घेण्यात आला  होता. न्यायालयाच्या आदेशानुसार, ज्या कैद्यांना सोडले जाऊ शकते, अशा सर्व कैद्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते. झारखंडच्या ३० जेलपैकी सात सेंट्रल जेल आहेत.

असे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश- देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ८ मे रोजी जेलमधील गर्दी कमी करण्यासाठी काही निर्देश जारी केले होते.- मागील वर्षी ज्या कैद्यांना महामारीमुळे जामीन किंवा पॅरोल देण्यात आला होता, त्यांनाही पुन्हा सुविधा देण्यात येण्यावर विचार करावा, असे म्हटले होते.- देशातील जेलमध्ये चार लाखांपेक्षा जास्त कैदी असून, त्यांच्या निगराणीसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करून सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्या. एल. नागेश्वर राव व न्या. सूर्यकांत यांच्या पीठाने म्हटले होते की, ज्या कैद्यांना मागील वर्षी महामारीमुळे सोडण्यात आले होते, त्यांनाही पुन्हा ९० दिवसांचा पॅरोल दिला जावा.-पीठाने क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या जेलमध्ये कोरोनाच्या प्रसाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. जेथे योग्य साफसफाई, स्वच्छता व आरोग्य सुविधा नाहीत तेथे खूपच काळजी घेण्याची गरज आहे, असे म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंगJharkhandझारखंड