शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ६० लाख स्थलांतरित कामगारांनी कोरोनाचा फैलाव केलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 07:04 IST

चुकीच्या धोरणामुळे मजुरांची फरपट

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संकेतस्थळावर अपलोड केलेल्या माहितीची छाननी केल्यावर हे स्पष्टपणे सिद्ध झाले की, दशलक्षावधी स्थलांतरितांनी कोरोना विषाणूचा फैलाव केलेला नाही.स्थलांतरित मजूर/कामगारांना त्यांच्या घरी जाऊ दिले तर ते कोरोना विषाणूचा फैलाव करतील, असे चित्र या विषयातील तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांनी समोर मांडले होते. काही दशलक्ष संख्येत स्थलांतरित मजूर/कामगार परतलेल्या तीन राज्यांच्या आणि एवढ्याच संख्येने स्थलांतरित मजूर/कामगार बाहेर पाठवलेल्या तीन राज्यांच्या संकेतस्थळावरील माहितीचा ‘लोकमत’ने अभ्यास केला.या माहितीतून हे स्पष्ट होते की, हे स्थलांतरित परतलेल्या बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अस्वस्थ करणारी वाढ झाल्याचा कोणताच कल दिसलेला नाही. वस्तुस्थिती ही आहे की, अभ्यास करण्यात आलेल्या दिवसांत (७ ते १३ जून) बिहारमध्ये रुग्णांच्या संख्येत घट दिसली. सात जून रोजी ३१९ रुग्ण होते तर १३ जून रोजी ती संख्या १२० होती. उत्तर प्रदेशतही रुग्ण संख्येत नाममात्र वाढ दिसली तीही शहरांमध्ये. ग्रामीण भागांत नाही.राज्यांकडे जवळपास ६० लाख स्थलांतरित आले. विशेष म्हणजे या राज्यांनी याच कालावधीत चाचण्यांची संख्याही लक्षणीय वाढवली आहे. प्रत्येक १०० रुग्णांमागे अनैसर्गिक वाटावी अशा वाढीची टक्केवारी नाही ती एका ठराविक अंतरावरच राहिली.महाराष्ट्रात सात जून रोजी २७३९ रुग्ण होते. ती संख्या १३ जून रोजी ३४९३ झाली तर दिल्लीत हीच संख्या १३२० पासून २१२६ वर गेली. हाच कल पंजाबमध्येही आहे. या राज्यांमध्ये चाचण्यांची संख्याही याच कालावधीत वाढली व तेथे चाचण्यांची संख्या कमी झाल्याचा आरोप आपोआपच खोटा ठरला. या वस्तुस्थितीवर भाष्य करायला सरकारमधील कोणीही तयार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या