शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

coronavirus: आग्राकडे निघालेल्या ५ मजुरांचा ट्रक अपघातात मृत्यू, ११ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 01:27 IST

हैदराबाद येथून आग्रा शहराकडे निघालेल्या ट्रकला उत्तर प्रदेशात अपघात झाला. यामध्ये ५ स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला. शिवाय ११ जण जखमी झाले आहेत.

लखनौ : तेलंगणामधील हैदराबाद येथून आग्रा शहराकडे निघालेल्या ट्रकला उत्तर प्रदेशात अपघात झाला. यामध्ये ५ स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला. शिवाय ११ जण जखमी झाले आहेत.हा ट्रक नरसिंगपूरजवळील पाथा या गावाजवळ पलटी झाला. नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी सांगितले की, हा ट्रक आंबे घेऊन निघाला होता. यात १६ मजूर आणि २ ड्रायव्हर मिळून १८ जण प्रवास करीत होते. हे मजूर तेलंगणातून उत्तर प्रदेशातील मूळ गावाकडे परत निघाले होते.गुजरातहून लखनौला आलेल्या रेल्वेमध्ये प्रवाशाचा मृतदेहगुजरातवरून लखनौ येथे आलेल्या विशेष श्रमिक एक्सप्रेसमध्ये शनिवारी एक व्यक्ती मेलेल्या अवस्थेत आढळली आहे. जवळच्या रुग्णालयात तपासले असता ती मरण पावली असल्याचे निश्चित झाले. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, ही गाडी भावनगर जिल्ह्यातील ढोला येथून निघाली होती. यातील कुणी प्रवासी आजारी असण्याची माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती. परंतु गाडी इथे पोहचली असता एका डब्यात एक व्यक्ती निपचित पडल्याचे समजले. या डब्यातील अन्य प्रवासी आधीच उतरले होते. तपासणीनंतर बलरामपूर रुग्णालयाने ही व्यक्ती मरण पावली आहे असे घोषित केले. याचे नाव कन्हैय्या (वय ३०) असून ते मूळचे सीतापूरचे आहेत.जबलपूरजवळ २० डबे घसरले, जिवितहानी नाहीनवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांना घेऊन सुरतहून उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहराकडे निघालेल्या ‘श्रमिक विशेष’ रेल्वेगाडीचे २० डबे रविवारी मध्य प्रदेशात जबलपूरजवळ घसरले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, इटारसी-जबलपूर विभागात जबलपूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या भितौनी स्टेशनजवळ ही घटना घडली. यानंतर तातडीने रेल्वेचे डबे जोडण्याचे काम करण्यात आले आणि रेल्वेगाडी मार्गस्थ झाली.लॉकडाऊनच्या काळात देशभरात मजूर कामाच्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना आपल्या मूळ गावी जाता यावे, यासाठी केंद्र सरकारने मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत रेल्वेने मजुरांना आपापल्या गावी पाठविण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघातcorona virusकोरोना वायरस बातम्या