शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: तब्बल ३३३८ कोरोनाबाधित रुग्ण बेपत्ता? या शहरातील प्रशासनाची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 11:18 IST

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाकडून या रुग्णांचा शोध सुरू आहे. मात्र या रुग्णांची काहीही माहिती अद्याप प्रशासनाला मिळालेली नाही.

ठळक मुद्दे बंगळुरूमध्ये कोरोनाचे ३ हजार ३३८ असे रुग्ण आहेत ज्यांची प्रशासनाकडे कुठलीही माहिती नाही या रुग्णांनी कोरोनाची चाचणी करताना फॉर्ममध्ये चुकीची माहिती जमा केली होतीगेल्या एक आठवड्यात रुग्णांची संख्या वेगाने वाढल्याने बंगळुरूमधील प्रशासनाने कोरोनाबाबतची सक्ती खूप वाढवली आहे

बंगळुरू - दररोज वेगाने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे देशासमोर निर्माण झालेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण आपल्या बेजबाबदारपणातून संसर्गाचा धोका वाढवत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला कोराना नियंत्रणात असलेल्या बंगळुरूमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढी आहे. त्यातच बंगळुरूमध्ये कोरोनाचे ३ हजार ३३८ असे रुग्ण आहेत ज्यांची प्रशासनाकडे कुठलीही माहिती नाही आहे.

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाकडून या रुग्णांचा शोध सुरू आहे. मात्र या रुग्णांची काहीही माहिती अद्याप प्रशासनाला मिळालेली नाही. याचं कारण म्हणजे या रुग्णांनी कोरोनाची चाचणी करताना फॉर्ममध्ये चुकीची माहिती जमा केली होती. कोरोनाचा अर्ज भरताना विविध माहिती भरून घेतली जाते. ज्यामध्ये रुग्णाचा पत्ता, मोबाइल क्रमांक आधींचा समावेश असतो. मात्र अनेक रुग्णांनी फॉर्मवर आपला पत्ता अर्धवट लिहिला. तसेच मोबाईल क्रमांकसुद्धा चुकीचा लिहिला. त्यामुळे लोकांची माहिती मिळत नाही आहे, असे बीबीएमपीचे आयुक्त मंजुनाथ यांनी सांगितले.

गेल्या एक आठवड्यात रुग्णांची संख्या वेगाने वाढल्याने बंगळुरूमधील प्रशासनाने कोरोनाबाबतची सक्ती खूप वाढवली आहे. देशातील आठ शहरांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. या शहरांमध्ये बंगळुरूचा समावेश आहे. दरम्यान, दिल्ली, मुंबई, चेन्नई, पुणे, ठाणे, अहमदाबाद, बंगळुरू (शहरी) आणि कोलकाता या शहरांचा कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेल्या शहरांचा समावेश आहे. पैकी, पुणे आणि बंगळुरूमध्ये परिस्थिती खूप खराब आहे.

देशातील इतर शहरांची तुलना करून पाहिल्यास पुणे आणि बंगळुरूही अशी शहरे आहेत. जिथे कोरोनाच्या रिकव्हरी रेटपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहे. बंगळुरूमध्ये रिकव्हरी रेट हा २३ टक्के आहे. तर कोरोनाच्या रिकव्हरी रेटची राष्ट्रीय सरासरी ही ६० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे बंगळुरूमध्ये कोरोविरोधातील लढाई बिकट झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकBengaluruबेंगळूरIndiaभारत