शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात लग्न करून फसले; २२ दिवस ३२ जण शाळेतच अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 09:03 IST

२२ दिवस वऱ्हाडी मंडळींच्या जेवणा-खाण्याची सोय करणं वधूकडच्या लोकांना परवडणारं नाही. 

छपरा: लॉकडाऊन असल्यानं लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. लग्न सोहळ्यांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. लॉकडाऊनच्या काळातील बरीच लग्न रद्द करण्यात आली आहेत. पण काही असेही उत्साही लोक आहेत, त्यांनी या काळातही लग्न सोहळे उरकून घेतले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोलकात्याहून आलेली ३२ वऱ्हाडी मंडळी बिहारमधल्या छपरा गावात अडकून पडली आहेत. या मंडळींनी पुन्हा कोलकात्यात परतण्याचे भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आलं नाही. आता त्यांच्याजवळ दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नाहीत. मुलीच्या गावातील आजूबाजूचे लोक त्यांना दोन वेळेचं जेवण देत आहेत. कारण वधूचं कुटुंबसुद्धा गरीब आहे.  २२ दिवस वऱ्हाडी मंडळींच्या जेवणा-खाण्याची सोय करणं वधूकडच्या लोकांना परवडणारं नाही. मांझीच्या इनायतपूर गावात कोलकाताहून फिरोज अख्तर लग्नाची वरात घेऊन आले. ज्याचं लग्न खुशबू खातून हिच्यासोबत पारंपरिक पद्धतीनं संपन्न  झालं. पण लग्नाच्या पुढच्याच दिवशी २३ मार्चला पूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे कोलकात्याहून आलेली वऱ्हाडी मंडळी गावातच अडकून पडली. वऱ्हाडी मंडळींमध्ये अनेक महिलांचाही समावेश आहे. मुलीकडच्यांनी या मंडळींची गावातील एका शाळेत व्यवस्था केली आहे. ३२ लोकांना दोन वेळेचं दररोज जेवण देणं हे मुलीकडच्यांच्या आवाक्यातील नाही. वधूसुद्धा वऱ्हाडी मंडळींबरोबर शाळेत राहत आहे. या कठीण काळात मांझीच्या लोकांनी त्यांना खूप मदत केली आहे. ज्या दिवशी वऱ्हाडी मंडळी गावात आली, लग्न झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना निरोप घ्यायचा होता, परंतु त्याचदरम्यान संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. वरात कोलकाताहून छपरा येथील मांझी येथे मिरवणुकीसाठी आली असता लॉकडाऊनमुळे ट्रेनसह रस्त्यांची वाहतूकही बंद झाली होती. त्यामुळे वधू-वर आणि वऱ्हाडी मंडळींना गावाबाहेरच्या शाळेत ठेवले. वऱ्हाडी मंडळींनी परत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना झारखंडच्या सीमेवरून परत मागे पाठवण्यात आलं. 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या