शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

CoronaVirus News: अखेरपर्यंत सोडली नाही मित्राची साथ; अमर आणि याकूबच्या मैत्रीला सोशल मीडियाचा सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 16:54 IST

CoronaVirus News: शेवटच्या क्षणापर्यंत मैत्रीचं नातं निभावलं; आजारी मित्राला कुशीत घेऊन रस्त्यातच थांबला

भोपाळ: कोरोनाचा प्रादुर्भाव देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे उद्योगधंदे ठप्प असून त्याचा सर्वाधिक फटका मजूर आणि कामगारांना बसला आहे. हाताला कामच नसल्यानं उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोट्यवधी मजुरांनी शहरं सोडून आपल्या गावची वाट धरली आहे. मिळेल त्या वाहनानं, तर कधी शेकडो किलोमीटर अंतर पायी चालत मजूर घराकडे निघाले आहेत. संकटाच्या काळात आपल्या माणसांनी पाठ फिरवल्याच्या घटना घडत असताना रक्ताचं नात नसतानाही काही जण अडचणीत सापडलेल्यांच्या मदतीला धावून जात असल्याच्या काही घटनादेखील समोर येत आहेत. मध्य प्रदेशच्या शिवपुरीमध्य हृदय हेलावून टाकणारा प्रसंग पाहायला मिळाला. २४ वर्षांचा अमृत गुजरातमधून उत्तर प्रदेशला निघाला होता. त्यावेळी त्याच्या सोबत त्याचा मित्र याकूब आणि इतर प्रवासी होते. रस्त्यात असताना अचानक अमृतची तब्येत बिघडली. त्याला उपचारांची गरज होती. मात्र चालकानं त्याला मध्य प्रदेशातल्या शिवपुरी जिल्ह्यात उतरवलं. अमृतच्या मदतीसाठी याकूबदेखील ट्रकमधून उतरला. रस्त्याच्या कडेला अमृतला कुशीत घेऊन याकूब गाड्यांना थांबण्याची विनंती करत होता.या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याकूब अमृतासाठी बराच वेळ मदत मागत होता. मात्र कोणीही मदतीला आलं नाही. खूप वेळानं मदत मिळाल्यानंतर अमृतला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना अमृतचा मृत्यू झाला. याकूब अगदी शेवटपर्यंत अमृताच्या सोबतीला होता.'अमृतला खूप ताप होता. त्याला उलट्या होत होत्या. उन्हामुळे त्याला त्रास झाला. अमृतला कोरोनाची बाधा झाली होती की नाही, याची माहिती त्याचा अहवाल आल्यानंतर समजेल,' अशी माहिती डॉ. पी. के. खरे यांनी दिली. याकूबला सध्या क्वॉरंटिन करण्यात आलं असून त्याची कोरोना चाचणी झाली आहे. मात्र अद्याप चाचणीचा अहवाल आलेला नाही. राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णयजाणून घ्या, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 4.0मध्ये काय सुरू अन् काय बंद?मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाणार ५० लाखांचा विमा; केंद्र सरकारची मोठी घोषणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या