शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : देशातील उपचाराधीन रुग्णसंख्या २ लाखांवर, २६ हजार नवे रुग्ण; मृत्युदरात आणखी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 05:04 IST

कोरोनाचे २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण सोमवारी आढळून आले. गेल्या ८५ दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. २० डिसेंबर रोजी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण सापडले होते. देशात कोरोनाचे १ कोटी १३ लाख रुग्ण असून, त्यातील १ कोटी १० लाख रुग्ण बरे झाले.  

नवी दिल्ली : देशात कोरोना साथीचा विळखा आणखी घट्ट होत असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २ लाखांवर पोहोचली आहे. १२ फेब्रुवारी रोजी उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ३० हजार होती. पण, अवघ्या महिनाभराच्या कालावधीत त्यामध्ये सुमारे ९० हजार रुग्णांची भर पडली आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या मृत्युदरात आणखी घट होऊन तो १.३९ टक्के झाला.

कोरोनाचे २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण सोमवारी आढळून आले. गेल्या ८५ दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. २० डिसेंबर रोजी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण सापडले होते. देशात कोरोनाचे १ कोटी १३ लाख रुग्ण असून, त्यातील १ कोटी १० लाख रुग्ण बरे झाले.  

सोमवारी या संसर्गामुळे आणखी ११८ जण मरण पावले व एकूण बळींचा आकडा १ लाख ५८ हजारांवर पोहोचला आहे. गेल्या पाच दिवसांत उपचाराधीन रुग्णांची संख्या सतत वाढत असून त्यांचे प्रमाण आता १.९३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९६.६८ टक्के झाले. बळी गेलेल्यांमध्ये ७० टक्क्यांहून जास्त लोक एकापेक्षा अधिक व्याधींनी आजारी होते.

अमेरिकेत ३ कोटी कोरोना रुग्णअमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटींवर पोहोचली आहे. तिथे २ कोटी २२ लाख जण बरे झाले असून ७३ लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. या देशात बळींचा आकडा साडेपाच लाखांच्या घरात पोहोचला आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १२ कोटी ४ लाख झाली असून, त्यातील ९ कोटी ६९ लाख लोक बरे झाले तर २ कोटी ७ लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. जगात या संसर्गाने २६ लाख ६५ हजार लोकांचा बळी गेला आहे.

महाराष्ट्रातून येणाऱ्यांना आठवडाभर क्वारंटाईनमहाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना एक आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. मध्य प्रदेशने छिंदवाडा, बालाघाट, बैतूल, सिओनी, खांडवा, बारवानी, खरगोन, बुऱ्हाणपूर या आठ सीमावर्ती जिल्ह्यांच्या प्रशासनाला तसे आदेश जारी केले आहेत.  

मनोरुग्णांनाही लस; केंद्राचे उत्तर मागविलेमनोरुग्णांनाही प्राधान्याने लस द्यावी, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागविले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३० एप्रिल रोजी होणार आहे.मनोरुग्ण, बेघर व्यक्तींना लस देण्यासाठी न्यायालयाने आदेश द्यावा, असे या जनहित याचिकेत म्हटले होते. 

मास्क घालावा, नियम पाळावेत : राहुल गांधीनागरिकांनी मास्क घालावेत व सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून संरक्षण करावे असे आवाहन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले आहे. गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असल्याचा आलेखही राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटसोबत जोडला आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र