नवी दिल्ली : कोरोनाबाधितांची संख्या मागील पाच दिवसांत लाखभराने वाढल्याने देशाने सात लाख रुग्णांचा टप्पा पार केला. मंगळवारी एका दिवसात नवे २२ हजार २५२ रुग्ण आढळले. बाधितांची संख्या एक लाख होण्यासाठी ११० दिवसांचा कालावधी लागला तर त्यानंतर केवळ४९ दिवसांत आणखी सहा रुग्णांची भर पडली.मंगळवारी आणखी ४६७ मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा २० हजार १६० इतका झाला. देशात सध्या ७ लाख १९ हजार ६६५ कोरोनाबाधित आहेत तर आजवर ४ लाख ३९ हजार ९४७ यातून बरे झाले. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१.१३ टक्के आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार देशात आजपर्यंत एकूण १ कोटी २ लाख ११ हजार ९२ इतक्या नमुन्यांची कोरोना चाचणी केली आली आहे.
coronavirus: केवळ ५ दिवसांत देशात कोरोनाचे लाखभर नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 06:46 IST