भीषण अपघातात िपता-पुत्रीचा करुण अंत

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:32+5:302015-01-03T00:35:32+5:30

नागपूर : भरधाव ट्रकची धडक बसल्यामुळे लुनास्वार िपता-पुत्रीचा करुण अंत झाला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शताब्दी चौकात गुरुवारी रात्री ९ वाजता हा भीषण अपघात घडला. ओमप्रकाश सरजुप्रसाद शाहू (वय ३५) आिण खुशबू (वय ६ वषेर्) अशी मृत िपता-पुत्रीची नावे आहेत. शाहू अजनीतील रामटेकेनगरात राहात होते.

Coronation End of Father and Girl in a Great Accident | भीषण अपघातात िपता-पुत्रीचा करुण अंत

भीषण अपघातात िपता-पुत्रीचा करुण अंत

गपूर : भरधाव ट्रकची धडक बसल्यामुळे लुनास्वार िपता-पुत्रीचा करुण अंत झाला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शताब्दी चौकात गुरुवारी रात्री ९ वाजता हा भीषण अपघात घडला. ओमप्रकाश सरजुप्रसाद शाहू (वय ३५) आिण खुशबू (वय ६ वषेर्) अशी मृत िपता-पुत्रीची नावे आहेत. शाहू अजनीतील रामटेकेनगरात राहात होते.
गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास शाहू िपता-पुत्री हे नरेंद्रनगर पुलाकडून आपल्या लुनाने रामेश्वरीकडे जात होते. शताब्दी चौकाजवळ मागून येणार्‍या भरधाव ट्रकने लुनाला जोरदार धडक मारली. त्यामुळे िचमुकल्या खुशबूचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शाहू गंभीर जखमी झाले. त्यांना मेिडकलमध्ये नेण्यात आले. एवढे गंभीर असूनही ते िचमुकल्या खुशबूचे काय झाले, याची िवचारणा करीत होते. त्यांना खुशबूचा मृत्यू झाल्याचे कळताच काही वेळेतच त्यांनीही प्राण सोडले. सुरू झालेल्या वषार्च्या पिहल्याच िदवशी शाहू कुटुंबीयांवर आघात झाल्यामुळे रामटेकेनगरात तीव्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, अपघातानंतर शताब्दी चौकीतील पोिलसांनी आरोपी ट्रक (सीजी ०४/ डीबी ४२४८) चालक राजकुमार मािणकराव टेंभरे (रा. ितरोडा, वडेगाव, िज. गोंिदया) याला अटक केली.
अपघातातील जखमीचा मृत्यू
स्कुटी पेपला भरधाव मोटरसायकलने धडक िदल्यामुळे गंभीर जखमी झालेले गणपतराव रामचंद्रजी भनारकर (वय ७४, रा.अयोध्या नगर) यांचा गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास मृत्यू झाला. १५ िडसेंबरच्या सायंकाळी ५.३० वाजता भनारकर दाम्पत्य स्कुटीने जात असताना उदयनगरात त्यांना मोटरसायकलने धडक िदली होती. त्यामुळे भनारकर गंभीर जखमी झाले होते. त्यांना सक्करदर्‍यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
संदीप गणपतराव भनारकर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोिलसांनी दोषी मोटरसायकलस्वारािवरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
----

Web Title: Coronation End of Father and Girl in a Great Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.