शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 05:43 IST

डॉ. रमण गंगाखेडकर : अभ्यास सुरू, घाईने निष्कर्ष काढणे चूक ठरेल; जीबीआरसीने निर्माण केली होती आशा

नवी दिल्ली : गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने (जीबीआरसी) कोरोना विषाणूचे (कोविड-१९) अस्तित्व नऊ स्वरुपात असल्याचे गुरुवारी सांगून त्यामुळे या महामारीचे रहस्य उलगडण्याबाबत आशा निर्माण झाल्याचा दावा केला होता. हा दावा इंडियन कॉन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) फेटाळून लावला आहे. जीबीआरसी ही सरकारची संस्था आहे. जीबीआरसीच्या दाव्यांमुळे कोविड-१९ वर लवकरच लस (व्हॅक्सीन) विकसित होईल अशी आशा निर्माण झाली होती.

काही शास्त्रज्ञांना तर असेही वाटले की, सार्स इत्यादीसारखा विषाणू जसा स्वत:च मरण पावतो तसा मृत्यू कोविड-१९ चाही होईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव हरीत शुक्ला म्हणाले की, डीएनए निश्चित करण्याच्या प्रक्रियेचे निष्कर्ष हे व्हायरल इन्फेक्शन आणि लस विकसित करण्यासाठी जी औषधाची व्यूहरचना करावी लागते त्यासाठी महत्वाचे ठरतात. तथापि, आयसीएमआरचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि प्रवक्ते डॉ. रमण आर.गंगाखेडकर म्हणाले, इतक्या तातडीने काही निष्कर्ष काढणे घाईचे होईल. कोरोना विषाणूच्या वेगवेगळ््या जाती भारतात चीन, इटली, इराणमधून आल्या आहेत. आम्ही केलेल्या अभ्यासाने हे दाखवले की चीनमधून जे लोक आले त्यांचा विषाणू हा इटलीतून आलेल्यांच्या विषाणूपेक्षा वेगळा आहे. इराणमधून आलेला विषाणू हा चीनमधील विषाणूशी काही सारखेपणा दाखवणारा आहे.विषाणूच्या अशा बदलांतून काहीही निष्कर्ष काढता येणार नाही. डॉ. गंगाखेडकर यांनी तीन  प्रकारचे विषाणू असतात, असे म्हटल्यामुळे गुजरातच्या प्रतिष्ठित अशा प्रयोगशाळेने काढलेल्या निष्कर्षाला धक्का बसला आहे. परंतु, विषाणूतील परिवर्तन वा बदल हे फारच कमी असून त्यांचा संपूर्ण डीएनए निश्चित करण्याचा अभ्यास सुरू आहे.सिक्वेंन्सिंगवर संशोधन सुरू आहेगुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने समाजमाध्यमांवर पहिल्यांदा बुधवारी उशिरा ‘यशाचा मार्ग सापडल्याचे’ जाहीर केले होते. नंतर गांधीनगर येथील इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सी. जी. जोशी म्हणाले की, ‘‘कोविड-१९ च्या नमुन्याचा जिनोम सिक्वेंन्सिंग हा गुजरातमधील रुग्णाचा घेण्यात आला होता व त्यातून नऊ परिवर्तन उघड झाले होते.च्त्यापैकी सहा हे वेगवेगळ््या देशांत पसरलेल्या महामारीतही होते; परंतु तीन बदल/परिवर्तन हे आमच्या सिक्वेंन्सिंगसाठी महत्त्वाचे आहेत. यातून हे दिसते की, विषाणू हा खूप वेगाने बदलत असतो.च्परिवर्तन वा बदल हे अनेक घटकांवर अवलंबून असतात व पुढील अभ्यास सुरू आहे. डॉ. गंगाखेडकर हे या प्रकरणाशी सहमत दिसत नाहीत ते म्हणाले, सिक्वेंन्सिंगवर संशोधन सुरू आहे.

टॅग्स :delhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्या