शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : गेल्या 14 महिन्यांपासून केंद्र सरकार काय करतंय? हायकोर्टाचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 17:02 IST

Corona Virus : न्यायालयाने केंद्र सरकारने देशात हाताळलेल्या कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना, गेल्या वर्षभरापासून परिस्थिती विदारक आहे, तरीही अजून कडक लॉकडाऊन लादलं जातंय

ठळक मुद्देन्यायालयाने केंद्र सरकारने देशात हाताळलेल्या कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना, गेल्या वर्षभरापासून परिस्थिती विदारक आहे, तरीही अजून कडक लॉकडाऊन लादलं जातंय

चेन्नई - देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या महिनाभरापासून झपाट्यानं वाढत आहे. वर्षाच्या सुरुवातीला देशातील स्थिती नियंत्रणात होती. मात्र, चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्षांनी मोठमोठ्या सभा घेतल्या. यावरून मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर, आता मद्रास उच्च न्यायालयानेकेंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कोरोना महामारीचं नियोजन आणि उपाय करण्यास सरकार असमर्थ ठरल्याचा ठपकाच न्यायालयाने ठेवला आहे. 

न्यायालयाने केंद्र सरकारने देशात हाताळलेल्या कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना, गेल्या वर्षभरापासून परिस्थिती विदारक आहे, तरीही अजून कडक लॉकडाऊन लादलं जातंय. आपल्याकडे गेल्या वर्षभरापासून वेळ होता, पण आता एप्रिल महिन्यातच आपण का सचोटीनं वागत आहोत. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन असतानाही तीच परिस्थिती का? असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी भारत सरकारचे मुख्य अॅटर्नी जनरल शंकरनारायणन यांना यासंदर्भात सवाल केला आहे.  सरकारच्यावतीने बोलताना शंकरनारायणनं यांनी, देशातील कोरोना रुग्णांची सध्याची वाढ अनपेक्षित होती, असे उत्तरादाखल म्हटले होते. त्यावर, मग गेल्या 14 महिन्यांपासून केंद्र सरकार काय करत होतं? असाही सवाल मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्यायमूर्ती सेंथीलकुमार राममूर्ती यांच्या खंडपीठाने केला आहे. 

निवडणूक आयोगावर हायकोर्टाचा संताप

राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी दिलीत, असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीब बॅनर्जींनी सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगापुढे उपस्थित केला होता. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्या अधिकाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशा शब्दांत न्यायालयानं संताप व्यक्त केला. न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसभांमध्ये फेसमास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम यांचे नियम धाब्यावर बसवले गेले, याबद्दल न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली.

२ मे रोजी निकालानंतर रॅली व एकत्र येण्यास बंदी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी काय उपाययोजना करणार आहात, असा प्रश्नदेखील न्यायाधीशांनी उपस्थित केला. मतमोजणीवेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची ब्लूप्रिंट सादर करा. अन्यथा २ मे रोजी होणारी मतमोजणी रोखू, असा गर्भित इशारादेखील त्यांनी दिला होता. त्यानंतर, निवडणूक आयोगाने २ मे रोजी निवडणूक निकालानंतर जल्लोष रॅली आणि विजयी मिरवणुकांना बंदी घातली आहे. यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHigh Courtउच्च न्यायालयChennaiचेन्नईCentral Governmentकेंद्र सरकार