शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

'कोव्हिशिल्ड'ची परिणामकारकता व अचूकतेवर प्रश्नचिन्ह! शंभर राजदुतांचा दौरा रद्द होण्याचे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 13:06 IST

लसीच्या विश्वासार्हतेवर जगभरातील काही तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हा दौरा रद्द झाल्याची चर्चा

ठळक मुद्दे'सिरम' संस्थेकडून आतापर्यंत कोविशिल्डचे चार कोटी डोस तयार

पुणे : ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्रॉझेनेका कंपनीच्या कोविशिल्ड या लसीची परिणामकारकता व अचुकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. काही स्वयंसेवकांना देण्यात आलेला अर्धा डोस, ही चुक असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. तसेच दोन पध्दतींमधील स्वयंसेवकांची संख्या, वयोगट याबाबतही कंपनीकडून स्पष्टीकरण न दिल्याने साशंकता व्यक्त होत आहे. सिरम संस्थेमध्ये याच लसीचे उत्पादन होत असल्याने जगभरातील शंभर राजदुतांचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'सिरम' संस्थेकडून आतापर्यंत कोविशिल्डचे चार कोटी डोस तयार करण्यात आले आहेत. कंपनीकडून आर्थिक जोखीम पत्करून हे उत्पादन केले जात असल्याने भारतासह जगभराचे लक्ष या लसीच्या परिणामकारकतेकडे लागले आहे. जगाला गरज असलेल्या कोरोनाच्या लसींच्या जवळपास निम्मे उत्पादन करण्याची सिरमची क्षमता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ‘सिरम’ला अनन्य साधारण महत्व आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील १०० देशातील राजदुत सिरम संस्थेला भेट देणार होते. पण राजदुतांचा दौरा अचानक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. लसीच्या विश्वासार्हतेवर जगभरातील काही तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हा दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे. त्यामागची कारणेही तशीच आहेत.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका स्वयंसेवकावर लसीचा विपरीत परिणाम झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे काही दिवस लसीच्या चाचण्याही थांबविण्यात आल्या होत्या. तसेच अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या चाचण्यांच्या निष्कर्षांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘लसीची परिणामकारक जवळपास ७० टक्के आहे. पहिला डोस अर्धा आणि महिनाभराने एक पुर्ण डोस दिल्यास ही परिणामकारकात ९० टक्क्यांपर्यंत जाते. तर दोन्ही डोस पुर्ण दिल्यानंतर हे प्रमाण ६२ टक्के एवढे आहे.’ कंपनीच्या या दाव्यावरच तज्ज्ञांकडून साशंकता व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यामुळे कंपनीकडूनही आता लस किती प्रभावी आहे, हे पाहण्यासाठी अतिरिक्त चाचण्या घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.-----------------तज्ज्ञांचे म्हणणे...- स्वयंसेवकांच्या एका गटाला अर्धा डोस व नंतर एक डोस तर दुसऱ्या गटाला दोन पुर्ण डोस दिले. प्रत्यक्षात कोणत्या पध्दतीनुसार लसीकरण होणार?- दोन्ही गटातील स्वंयसेवकांचे प्रमाण व वयोगट वेगळा असल्याने परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह- लस दिल्यानंतर कोरोनाचा संसर्ग स्वयंसेवकांना झाला की नाही, याचे स्पषटीकरण नाही- गोंधळून टाकणाऱ्या आकडेवारीमुळे संभ्रम- लसीच्या दुष्परिणामांबाबत कंपनीकडून मौन-------------------------------------सिरममधील राजदुतांच्या दौऱ्यामध्ये जगभराची लसीची गरज, सध्याचे उत्पादन, क्षमता, वितरण आदी मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता होती. हा दौरा म्हणजे लसीच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब केल्यासारखे होते. पण लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागल्याने दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे. अ‍ॅस्ट्रॉझेनेकाकडून लसीबाबतच्या सर्व शंका दुर केल्यानंतरच हा दौरा पुन्हा ठरू शकतो, अशी शक्यता आहे.-------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी