शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 10:35 IST

Corona Virus : भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे.

भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (२३ मे २०२५) गुजरातमध्ये २०, हरियाणामध्ये ५, उत्तर प्रदेशात ४ नवीन रुग्ण आढळले. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये ९ महिन्यांचं बाळ कोरोना पॉझिटिव्ह आलं आहे. देशभरात आतापर्यंत एकूण ३१२ एक्टिव्ह रुग्ण आहेत, तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. धोका वाढत असल्याचे पाहून दिल्लीमध्ये लोकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दिल्ली सरकारने म्हटलं आहे की, सर्व रुग्णालयांनी बेड, ऑक्सिजन, औषधे आणि लसींची पूर्ण व्यवस्था करावी. तसेच, रुग्णालयांना प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी लोकनायक रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि सर्व संस्था त्यांचे रिपोर्ट दररोज आरोग्य डेटा पोर्टलवर अपलोड करतील.  "आतापर्यंत २३ कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि हे सर्व रुग्ण खासगी लॅबमधून आले आहेत. हे लोक दिल्लीचे रहिवासी आहेत की बाहेरून आले आहेत याची पुष्टी केली जात आहे" अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री पंकज सिंह यांनी दिली आहे. 

 बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

गुजरातमधून आतापर्यंत एकूण ४० रुग्ण नोंदवले गेले आहेत आणि त्यापैकी ३३ एक्टिव्ह आहेत. हरियाणामधून ५ रुग्ण समोर आले आहेत, ज्यामध्ये दोन महिला आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्येही ४ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी ३ रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

कोरोनाचे आकडे सतत बदलत आहेत, शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने २५७ एक्टिव्ह रुग्णांची माहिती दिली होती. राजस्थानमध्ये दोन, सिक्कीममध्ये एक, महाराष्ट्रात ५६, केरळमध्ये ९५, पश्चिम बंगालमध्ये एक, कर्नाटकमध्ये १६, पुद्दुचेरीमध्ये १० आणि तामिळनाडूमध्ये ६६ रुग्ण आढळले आहेत. दोन जणांचा मृत्यूही झाला आहे.

कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट

आंध्र प्रदेश आरोग्य विभागाने नागरिकांना प्रार्थना सभा, पार्टी, लग्नसमारंभ किंवा सामाजिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने एकत्र येणं टाळण्यास सांगितलं आहे. बस स्टॉप, रेल्वे स्थानके आणि विमानतळ यासारख्या सार्वजनिक ठिकाणी लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितलं. ज्या प्रवाशांनी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत अशा देशांना भेट दिली आहे त्यांनाही टेस्ट करण्यास सांगण्यात आलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट जेएन-१ शी संबंधित काही प्रकरणं आढळल्यानंतर झारखंडचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतGujaratगुजरातdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशKarnatakकर्नाटक