शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

CoronaVirus News : आग्र्यातील दोन गावात कोरोनाचा कहर! 20 दिवसांत लक्षणे दिसणाऱ्या 64 लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 9:08 AM

CoronaVirus News :गावातील लोक अजूनही खूप बेफिकीर आहेत. मास्क आणि सोशल डिस्टसिंगचे पालन केले जात नाही.

ठळक मुद्देगावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, खोकला-सर्दी-ताप आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे.

आग्रा : उत्तर प्रदेशातील गावांमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. येथील आग्रामधील दोन गावांमध्ये गेल्या 20 दिवसांत 64 लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांना आधी ताप आला, नंतर श्वास घेण्यात त्रास झाला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दोन गावांमधील 64 लोकांच्या मृत्यूनंतर येथील आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. या गांवामधील 100 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यामध्ये 27 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. (CoronaVirus : Death of 64 people with symptoms of corona in  two villages in Agra)

आग्रापासून जवळपास 40  कि.मी. अंतरावर एत्मादपूरचे गाव कुरगवान आहे. येथे गेल्या 20 दिवसांत 14 लोकांचा मृत्यू झाला. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, खोकला-सर्दी-ताप आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच या गावातील लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी जवळपास 100 नमुने घेण्यात आले असून त्यामध्ये 27 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

ज्या लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांना कुरगवानमधील प्राथमिक शाळेतील आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या आयसोलेशन सेंटरमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. यामुळेच आयसोलेशन सेंटरमधील 65 वर्षांच्या वृद्धांची प्रकृती अधिकच गंभीर झाली आहे. त्यामुळे वृद्धांना आता आग्रा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

(धक्कादायक! कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अवघ्या काही तासांत डॉक्टरचा मृत्यू!)

दुसरीकडे, गावातील लोकांमध्ये कोणतीही जागरूकता नाही. ज्या लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, ते भीतीपोटी  शहरातील रुग्णालयात जायला तयार नाहीत. काही ग्रामस्थांनी सांगितले की ज्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, ते देखील गावात फिरत असतात, तसेच आयसोलेशन सेंटरमध्ये हे लोक  एका ठिकाणी बसत नाहीत.

याचबरोबर, आग्रामधील आणखी एका गावात  कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. बामरौली कटारा असे या गावचे नाव आहे. सुमारे 40 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाचे सरपंच म्हणाले, आतापर्यंत येथे  50 लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांचे आरोग्य बिघडते, नंतर त्यांना श्वास घेण्यास अडचण येते आणि थोड्या वेळातच त्यांचा मृत्यू होतो, असे गावाचे सरपंच म्हणाले. 

(Corona Vaccine: खासगी रुग्णालयांमध्ये सर्वात महाग मिळतेय कोरोनाची लस, जाणून घ्या किंमत...)

सतत विनवणी केल्यावर याठिकाणी आरोग्य विभागाची टीम पोहोचली आणि 46 जणांची कोरोना टेस्ट केली, त्यामध्ये दोन लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. गावातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे अद्याप पूर्णपणे कोरोना टेस्टिंग झाली नाही. दरम्यान, या गावातील लोक अजूनही खूप बेफिकीर आहेत. मास्क आणि सोशल डिस्टसिंगचे पालन केले जात नाही.

बमरौली कटारा गावातील सार्वजनिक आरोग्य केंद्राला कुलूप लावण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी हे सार्वजनिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आले होते. याठिकाणी नर्स आणि फार्मासिस्ट येते होते, मात्र आता याठिकाणी कोणीही येत नाही, असे येथील गावकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसUttar Pradeshउत्तर प्रदेश