कोरोनाची पुन्हा धास्ती; जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १००० च्या पुढे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 07:49 PM2024-01-12T19:49:07+5:302024-01-12T19:50:10+5:30

आतापर्यंत १६ पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जेएन.१ व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 

corona virus sub variant jn 1 cases cross 1000 advisory to state governments | कोरोनाची पुन्हा धास्ती; जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १००० च्या पुढे!

कोरोनाची पुन्हा धास्ती; जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १००० च्या पुढे!

नवी दिल्ली: कोरोनाचा नवीन व्हेरिएंट जेएन.१ चा प्रादुर्भाव आता देशात वेगाने वाढत आहे. शुक्रवारी ताज्या प्रकरणांची नोंद झाल्यानंतर देशातील एकूण रुग्णांची संख्या १००० च्या पुढे गेली आहे. आतापर्यंत १६ पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जेएन.१ व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 

सार्स सीओव्ही २ जिनोमिक्स कन्सोर्टियमकडून (आयएनएसएसीओजी) शुकवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार, कर्नाटक राज्यात या व्हेरिएंटचे सर्वाधिक २१४ रुग्ण आहेत. यापाठोपाठ महाराष्ट्रात १७०, केरळमध्ये १५४, आंध्र प्रदेशात १८९, गुजरातमध्ये ७६, गोवा राज्यात ६६, राजस्थान आणि तेलंगणमध्ये प्रत्येकी ३२, छत्तीसगडमध्ये २५, तामिळनाडूमध्ये २२ रुग्ण सापडले आहेत.

याचबरोबर, दिल्लीत १६, उत्तर प्रदेशात ६, हरयाणामध्ये ५, ओडिशामध्ये ३, पश्चिम बंगालमध्ये दोन तर उत्तराखंडमध्ये एक रुग्ण सापडलेला आहे. दरम्यान, नव्या आकडेवारीनुसार, देशातील जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १०१३ वर पोहोचली आहे. इतर व्हेरिएंटच्या तुलनेत हा व्हेरिएंट धोकादायक असल्याने आवश्यक ती दक्षता बाळगावी, असे निर्देश यापूर्वीच केंद्र सरकारने राज्यांना दिलेले आहेत. 

याशिवाय, इन्फ्लूएंझा सारखा आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (SARI) यावरही लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. केंद्राने सर्व राज्यांना जिल्हावार प्रकरणांचे निरीक्षण करण्यास सांगितले आहे.

Web Title: corona virus sub variant jn 1 cases cross 1000 advisory to state governments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.