शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : संपूर्ण देशात ऑक्सिजनची टंचाई; हे राज्य मात्र रुग्णांची गरज भागवून शेजारील राज्यांना पुरवतेय प्राणवायू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 11:43 IST

medical oxygen in India : ऑक्सिजनची वाढती गरज भागवण्यासाठी केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत आहे. पण दक्षिणेतील केरळमध्ये मात्र नेमकं उलट चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देदेशभरात ऑक्सिजनसाठी धावपळ होत असली तरी केरळमध्ये सध्या मौल्यवान ठरत असलेल्या ऑक्सिजनचे पुरेसे उत्पादन होत आहेगरज पडली तर पुढच्या काळात अतिरिक्त उत्पादन करण्याची क्षमता केरळकडे आहेघडीची आकडेवारी पाहिल्यास केरळ सध्या दररोज ७० मेट्रिक टन ऑक्सिजन तामिळनाडूला आणि १६ मेट्रिक टन ऑक्सिजन कर्नाटकला पुरवत आहे

तिरुवनंतपुरम - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. (corona virus in India) वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांसाठीला लागणाऱ्या ऑक्सिजनची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. (medical oxygen in India) ऑक्सिजनची वाढती गरज भागवण्यासाठी केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत आहे. पण दक्षिणेतील केरळमध्ये मात्र नेमकं उलट चित्र दिसत आहे. केरळमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी येथे रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन (Oxygen Cylinder) मिळत असून, येथून शेजारील राज्यांनाही ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. (oxygen shortage throughout in India; however Kerala caters to the needs of the patients and supplies oxygen to the neighboring states)

सध्या देशभरात ऑक्सिजनसाठी धावपळ होत असली तरी केरळमध्ये सध्या मौल्यवान ठरत असलेल्या ऑक्सिजनचे पुरेसे उत्पादन होत आहे. एवढेच नाही तर गरज पडली तर पुढच्या काळात अतिरिक्त उत्पादन करण्याची क्षमता या राज्याकडे आहे. या घडीची आकडेवारी पाहिल्यास केरळ सध्या दररोज ७० मेट्रिक टन ऑक्सिजन तामिळनाडूला आणि १६ मेट्रिक टन ऑक्सिजन कर्नाटकला पुरवत आहे.  डेप्युटी चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव्ह अँड मेडिकल ऑक्सिजन मॉनिटरिंग चे नोडल अधिकारी डॉ. आऱ वेणुगोपाल यांनी सांगितले की, कोविड केअरसाठी आम्हाला दररोज ३५ मेट्रिक टन ऑक्सिजन आणि नॉन कोविड केअरसाठी दररोज ४५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गजर आहे.  आमची एकूण क्षमता १९९ मेट्रिक टन प्रतिदिन आहे. तसेच गरज भासल्यास आम्ही आपली उत्पादन क्षमता अधिक वाढवू शकतो. 

केरळमध्ये ऑक्सिजनची टंचाई न जाणवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे येथे रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र देशातील इतर राज्यांप्रमाणे येथील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत नाही आहे. दुसरीकडे देशातील इतर राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. ''आम्ही प्राथमिक टप्प्यामध्येच कोरोना रुग्णांचे निदान करण्यात सक्षम आहोत. त्यामुळे आम्ही लवकर उपचार सुरू करण्यात यशस्वी ठरतोय. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजन लावायची गरज भासत नाही आहे, असे केरळमधील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. मोहम्मद अशील यांनी सांगितले. 

आज इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवत असलेल्या केरळमध्ये गेल्यावर्षी ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यानच केरळने योग्य ती पावले उचलली. जेव्हा देशात कोरोनाचे रुग्णा वाढू लागले तेव्हा डॉ. वेणुगोपाल यांनी सर्व बल्क प्लँट्स आणि मेडिकल ऑक्सिजन निर्मात्यांना पत्र लिहून उत्पादन वाढवण्याची सूचना केली. त्यामुळे हे संकट वाढण्याआधीच केरळमधील मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन वाढले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतKeralaकेरळOxygen Cylinderऑक्सिजनMedicalवैद्यकीय