शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant : तब्बल 59 देशांत ओमायक्रॉन व्हेरिअंटचा कहर; समोर आले एवढे रुग्ण, जाणून घ्या भारताची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 18:51 IST

दरम्यान, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेला एक रुग्ण समोर आला आहे. ज्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे,  ती टांझानियाहून परतली होती.

आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉनच्या सध्यस्थितीवर शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी देशातील ओमाक्रॉनच्या स्थितीसंदर्भात माहिती देण्यात आली. तसेच, देशात आतापर्यंत या व्हेरिअंटचे 25 रुग्ण आढळून आले असल्याचे सांगण्यात आले. सर्वात पहिले कर्नाटकात ओमायक्रॉनची लागन झालेले दोन रुग्ण समोर आले होते. (Omicron cases in World)

पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, हा प्रकार आतापर्यंत एकूण 59 देशांमध्ये पसरला असून एकूण 2936 रुग्णांची नोंद झाली आहे. 24 नोव्हेंबरला, दक्षिण आफ्रिकेच्या गोटेंग प्रांतात या व्हेरिअंटची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती. तसेच 26 नोव्हेंबर रोजी WHO ने याला व्हेरिअंट ऑफ कंसर्न म्हणून घोषित केले.

यूकेमध्ये सर्वाधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण -एकूण 2, 936 रुग्णांपैकी सर्वाधिक 817 रुग्ण यूकेमध्ये आहेत. तर डेनमार्कमध्ये 796 आणि दक्षिण आफ्रिकेत 431 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय, कॅनडामध्ये 78, अमेरिकेत 71, जर्मनीमध्ये 65, दक्षिण कोरियामध्ये 60, ऑस्ट्रेलियामध्ये 52, झिम्बाब्वेमध्ये 50, फ्रान्समध्ये 42, पोर्तुगालमध्ये 37, नेदरलँडमध्ये 36, नॉर्वेमध्ये 33, घानामध्ये 33 आणि बेल्जियममध्ये 30 रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत आणखी एक रुग्ण - दरम्यान, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेला एक रुग्ण समोर आला आहे. ज्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे,  ती टांझानियाहून परतली होती.

भारतात बदलण्यात आले आहेत अनेक नियम -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आल्यानंतर, भारतात ट्रॅव्हल अॅडव्हायजरीत बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या प्रकाराबाबत योग्य मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच, नवे आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल अॅडव्हायजरीही लागू करण्यात आली आहे. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस