शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

CoronaVirus News : कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 07:39 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही त्याच पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसच्या संक्रमणानं जगभरात अनेक देश त्रस्त आहेत.अमेरिका, रशिया यांसारख्या बलाढ्य देशांनाही कोरोनाचा फटका बसला आहे.कोरोना विषाणूच्या संदर्भात चीन आणि डब्ल्यूएचओच्या भूमिकेबद्दल जगातील अनेक देशांना संशय आहे.

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसच्या संक्रमणानं जगभरात अनेक देश त्रस्त आहेत. अमेरिका, रशिया यांसारख्या बलाढ्य देशांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरस हा चीनच्या प्रयोगशाळेतच बनवण्यात आल्याचा आरोप अमेरिकेकडून वारंवार केला जात आहे. कोरोना विषाणूच्या संदर्भात चीन आणि डब्ल्यूएचओच्या भूमिकेबद्दल जगातील अनेक देशांना संशय आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही त्याच पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी NDTV या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे, त्यात त्यांनी मोठा खुलासा केला. कोरोना व्हायरस लॅबमधूनच आला आहे. तो नैसर्गिक नव्हे, तर कृत्रिम व्हायरस आहे, असंही ते म्हणाले आहेत. कोरोना विषाणूसह जीवन जगण्याची कला आपण शिकली पाहिजे. कोरोना विषाणू प्रथम चीनच्या वुहान शहरात दिसून आला आणि त्यानंतर तो जगभरात पसरला. हा नैसर्गिक विषाणू नाही, तो प्रयोगशाळेत बनविला गेला आहे. बरेच देश कोरोनावर लस तयार करण्याचे काम करत आहेत, परंतु त्यात यश मिळालेलं नाही, असेही गडकरी म्हणाले आहेत. अनेक देश या प्राणघातक विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहान लॅबमधून झाल्याचा आरोप करत आहेत. त्याचदरम्यान नितीन गडकरींनी केलेले हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, या विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची आधी ओळख पटणे आवश्यक आहे. या विषाणूला तात्काळ ओळखता येईल, अशी कार्यपद्धती शोधून काढण्याची  गरज आहे. कारण हा व्हायरस कृत्रिम आहे, नैसर्गिक नाही. लवकरच भारत या विषाणूवर मात करेल. भारतासह अनेक देश लस विकसित करण्यासाठी काम करत आहेत. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा या विषाणूला चीन जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसेच या विषाणूला ट्रम्प हे चिनी विषाणू म्हणून संबोधतात.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही स्थलांतरित मजुरांच्या स्थलांतरणावर भाष्य केले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे प्रभारी मंत्री गडकरी म्हणाले की, या प्राणघातक विषाणूच्या भीतीने प्रवासी कामगार आपापल्या घरी गेले आहेत. व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यावर स्थलांतरित मजूर कामावर परत येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आम्ही कोरोनाविरुद्ध युद्ध तसेच आर्थिक युद्धही लढत आहोत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस