शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

Corona Virus: देशात कोरोना रुग्णांचा महिनाभरातील उच्चांक; १६७५२ नवे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 4:57 AM

देशातील उपचाराधीन रुग्णांपैकी ८६.३७ टक्के रुग्ण महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये आहेत. त्यामध्ये केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात या राज्यांचाही समावेश आहे. तर देशातील महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सतत वाढती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रविवारी कोरोनाचे १६७५२ नवे रुग्ण सापडले असून ही गेल्या महिनाभरातील सर्वाधिक संख्या आहे. देशात कोरोनाचे सुमारे १ कोटी ११ लाख रुग्ण असून त्यातील १ कोटी ७ लाख ७६ हजार रुग्ण बरे झाले आहेत. रविवारी ११३ जणांचा बळी गेला.

गेल्या २९ जानेवारीला कोरोनाचे १८ हजार ८०० नवे रुग्ण आढळले होते. देशात बळींची एकूण संख्या १ लाख ५७ हजार झाली आहे. उपचाराधीन रुग्णांचा आकडा १ लाख ६४ हजारपर्यंत वाढला आहे. या रुग्णांचे प्रमाण १.४८ टक्के तर बरे झालेल्यांचे एकूण प्रमाण ९७.१० टक्के झाले आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४२ टक्के आहे. रविवारी कोरोनाचे ११७१८ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत १ कोटी ४३ लाख लोकांना लस देण्यात आली. 

सहा राज्यांत ८६.३७% उपचाराधीन रुग्णदेशातील उपचाराधीन रुग्णांपैकी ८६.३७ टक्के रुग्ण महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये आहेत. त्यामध्ये केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात या राज्यांचाही समावेश आहे. तर देशातील महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सतत वाढती आहे.

७९३५ खासगी केंद्रे कोरोना लसीसाठी देशात कोरोना लस देण्यासाठी ७९३५ खासगी केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्या केंद्रांची राज्यवार संख्या याप्रमाणे आहे. 

जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेची मान्यताnवॉशिंग्टन : जॉन्सन अँड जॉन्सनच्या केवळ एकाच डोसच्या असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. nया देशात आतापर्यंत तीन लसींना ही परवानगी मिळाली आहे. ही लस फ्रीझरऐवजी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली तरी चालवणार असून त्यामुळे साठवणूक करणे अधिक सोपे झाले. nजॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीची किंमत सामान्यांच्या खिशाला परवडेल अशी ठेवण्यात येईल. अमेरिकेमध्ये मॉडेर्ना व फायझरच्या या दोन डोसच्या कोरोना लसींना याआधीच आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. 

उत्तर प्रदेश (१५४५)तामिळनाडू (८३७)महाराष्ट्र (६५९)गुजरात (६२०)पंजाब (५९७)आंध्र प्रदेश (५४५)झारखंड (४७५)कर्नाटक (४६०)छत्तीसगढ (३७७)केरळ (३७७)हरयाणा (३६७)मध्यप्रदेश (३२३)बिहार (२५३)आसाम (१५४)उत्तराखंड (८४)हिमाचल प्रदेश (६६)दिल्ली (५६)जम्मू-काश्मीर (३४)मेघालय (१७)चंदीगड (१६)नागालँड (१४)गोवा (१३)तेलंगणा (१२)पुडुच्चेरी (११)मणिपूर (९)मिझोराम (५)पश्चिम बंगाल (५)त्रिपुरा (२)अरुणाचल प्रदेश (१)सिक्कीम (१)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या