शहरं
Join us  
Trending Stories
1
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
2
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
3
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
4
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
5
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
6
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
7
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
8
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
9
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
10
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
11
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
12
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
13
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
14
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
15
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
16
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
17
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
18
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
19
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
20
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!

Corona virus ; पुरेशा मनुष्यबळाअभावी अमेरिकन अर्थव्यवस्थेचे नुकसान,एच1बी व्हिसा स्थगितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 07:05 IST

भारतातील आयटी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार

ठळक मुद्देदरवर्षी भारतातून अडीच लाख लोक एच1बी व्हिसासाठी करतात अर्ज

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : कोरोनाच्या अनपेक्षित संकटाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. या संकटातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'एक्झिक्युटिव्ह ऑर्डर' काढत एच १बी या व्यावसायिक व्हिसासह तेथे काम करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्हिसा वर्षअखेरीपर्यंत स्थगित केले आहेत. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या किंवा जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. मात्र, भारतातील आयटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. कारण, तेथील औद्योगिक क्षेत्राला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार नाही.

       एच1बी सह अन्य नोकरीविषयक व्हिसा स्थगित केल्यास भारतातून अमेरिकेत कर्मचारी पाठवणे भारतीय कंपन्यांना अवघड होणार आहे.  यावर्षी ट्रम्प पुन्हा अध्यक्षपद मिळवू इच्छित असल्याने मतदार जपण्यासाठी त्यांनी परदेशी कर्मचार्‍यांना अमेरिकेत येण्यावर निर्बंध आणल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अनेक भारतीय व अमेरिकी कंपन्यांना नवीन आर्थिक वर्षांसाठी अमेरिकन शासनाने एच १बी व्हिसा दिले होते. त्यांना आता अमेरिकेच्या राजनैतिक दूतावासांकडून मंजुरी मिळण्यासाठी चालू आर्थिक वर्षांच्या अखेरीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

       'फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज' या संघटनेचे सचिव विनोद ए.जे. म्हणाले, 'कोरोना संकटाचा परिणाम सर्वच औद्योगिक क्षेत्रांवर झाला आहे. मात्र, आयटी कर्मचारी लॉकडाऊनच्या काळातही 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत. त्यामुळे ही इंडस्ट्री अद्याप तग धरून आहे. मात्र, बेरोजगारीचे कारण पुढे करत ट्रम्प प्रशासनाने घेतलेला निर्णय आयटी क्षेत्रासाठी नुकसानदायक ठरणार आहे. स्थलांतरित कामगारांवर या काळात संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे. आम्ही सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या आयटी कर्मचाऱ्यांशी आम्ही संपर्क साधत आहोत. त्यानंतर संघटनेची याबाबतची भूमिका स्पष्ट केली जाईल.'

     दिलीप ओक अकॅडमीचे संचालक दिलीप ओक म्हणाले, 'भारतातील विद्यार्थी एफ1 व्हिसावर अमेरिकेत शिक्षणासाठी जातात. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही. मात्र, आयटी कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापर्यंत या निर्णयाचा फटका बसू शकतो. आगामी निवडणूक जिंकण्यासाठी ट्रम्प यांनी लढवलेली ही शक्कल आहे. मात्र, भारताप्रमाणे अमेरिकेत हुकूमशाही नसल्यामुळे हा निर्णय कायद्यात रूपांतरीत होणार नाही. अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार आहे.'

-------

दर वर्षी भारतातून अडीच लाख लोक एच1बी व्हिसासाठी अर्ज करतात. 1 एप्रिलला लॉटरीद्वारे साधारणपणे ८५ हजार लोकांचा व्हिसा मंजूर केला जातो. त्यामध्ये आयटी कर्मचाऱ्यांची संख्या ३०-३५ हजार असते. त्यांना काऊन्सलेटला जाऊन स्टॅम्प मारून घेण्यासाठी आता डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागेल. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असला तरी ते पुन्हा निवडून येतील की नाही याबद्दल शाश्वती नाही. 

- दिलीप ओक, संचालक, ओक अकॅडमी

 

-----

एच1बी व्हिसा नाकारण्याचे प्रमाण

अमेरिकेतील नॅशनल फाऊंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी या अभ्यासगटाने २०१९ मध्ये एच1बी व्हिसा नाकारण्यात आलेल्या प्रमाणाचा अभ्यास केला होता.  युएस सिटिझनशिप अॅंड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार अभ्यास करण्यात आला. २०१५ मध्ये एच1बी व्हिसा नाकारले जाण्याचे प्रमाण ६ टक्के होते. २०१९ मध्ये २४ टक्क्यांवर पोचले होते. चार वर्षांत व्हिसा नाकारण्याचे प्रमाण चौपट झाले. 

टॅग्स :PuneपुणेjobनोकरीAmericaअमेरिकाbusinessव्यवसाय