शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

Corona Virus : जन्मलेल्या जुळ्या बाळांना कोरोनाची बाधा, रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 08:47 IST

Corona Virus : देशभरात ४५ वर्षे वयाच्या पुढील लोकांना लस देण्यास सुरुवात झाली असली तरी युवकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होऊन ते ‘सुपर स्प्रेडर’ बनत असल्याने सरसकट सर्वांनाच लस देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देएकीकडे लसीकरण जोरात सुरु असताना, दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. महाराष्ट्रात ० ते २० वर्षे वयातील ७३,५३६ मुले तीन महिन्यात बाधित झाली आहेत

वडोदरा - देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यात शून्य ते १० वर्षे वयाच्या २०,१७१ मुलांना, तर ११ ते २० वर्षे वयोगटातील ५३,३६५ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातच, गुजरातच्यावडोदरा येथे जन्मजात जुळ्या बाळांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. एसएसजी रुग्णालयातील पीडियाट्रीक विभागाच्या प्रमुखांनी यांसदर्भात माहिती दिली.  

देशभरात ४५ वर्षे वयाच्या पुढील लोकांना लस देण्यास सुरुवात झाली असली तरी युवकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होऊन ते ‘सुपर स्प्रेडर’ बनत असल्याने सरसकट सर्वांनाच लस देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकीकडे लसीकरण जोरात सुरु असताना, दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. महाराष्ट्रात ० ते २० वर्षे वयातील ७३,५३६ मुले तीन महिन्यात बाधित झाली आहेत. कोरोनाचा सर्वात जास्त फटका ३१ ते ४० वर्षे वयोगटातील तरुणांना बसला आहे. या वयोगटातील १,७७,७६९ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. गुजरातध्ये जन्मजात जुळ्या बाळांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात माहिती देताना डॉ. अय्यर म्हणाल्या की, या लहान बाळांमध्ये दस्त आणि पाण्याच कमतरता असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी, दोन्ही बाळांच कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये, दोघांचाही अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला आहे.  या बाळांचा जन्म झाल्यानंतर 15 दिवसांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्यापही त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचंही डॉ. अय्यर यांनी सांगितलं.  

वडोदऱ्यातही रात्रीची संचारबंदीगुजरातमध्येही वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन, अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोट येथे रात्रीची संचारबंदी 15 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. मंगळवारी राज्यात कोरोना वायरसमुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यातील हा सर्वात मोठा आकडा आहे. राज्यात आत्तापर्यंत 4,510 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत एकूण 12,263 एक्टीव्ह रुग्ण असून 147 जणांची प्रकृती गंभीर आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसGujaratगुजरातvadodara-pcवडोदराhospitalहॉस्पिटल