शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Cases In India : 'ही' सामान्य लक्षणं जरी दिसली तरी करून घ्या कोरोना टेस्ट, केंद्राचं राज्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 23:53 IST

देशातील अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेत चाचण्यांचा वेग वाढविणे आवश्यक असल्याचेही केंद्राने म्हटले आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून इशारा दिला आहे. खोकला, डोकेदुखी आणि घशात खवखव होत असेल तरीही कोरोना चाचणी करावी, असे केंद्राने म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि ICMR प्रमुख बलराम भार्गव यांच्या संयुक्त पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, RTPCR चाचणीचा अहवाल मिळण्यास विलंब होऊ शकतो, यामुळे राज्य सरकारांनी रॅपिड अँटीजेन चाचणीचा (RAT) अधिकाधिक वापर करावा.

याशिवाय, देशातील अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेत चाचण्यांचा वेग वाढविणे आवश्यक असल्याचेही केंद्राने म्हटले आहे. केंद्राने राज्यांना सांगितले आहे, की ते RTPCR व्यतिरिक्त रॅपिड अँटीजन टेस्ट आणि ICMR मान्यताप्राप्त होम टेस्टिंग किटचाही वापर करू शकता, जेणेकरून कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची वेळेत टेस्ट होईल आणि त्यांना वेळीच आयसोलेट करता येऊ शकेल.

'या' लक्षणांवर लक्ष देणे आवश्यक -केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सूचित केले आहे, की सध्याची वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता, जर कुणालाही खोकला, डोकेदुखी, घशात खवखव, श्वास लागणे, अंगदुखी, चव अथवा वास घेण्यात समस्या, थकवा आणि जुलाब होण्याचा त्रास होत असेल, तर त्याला संशयास्पद प्रकरण मानून, अशा सर्व व्यक्तींची चाचणी करायला हवी आणि चाचणीचा रिझल्ट पाहून त्या सर्वांना ताबडतोब आयसोलेट होण्याचा सल्ला द्यायला हवा. तसेच, अशा सर्व लोकांनी आरोग्य मंत्रालयाच्या आयसोलेशन संदर्भातील दिशानिर्देशांचे पालन करावे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOmicron Variantओमायक्रॉन