शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कोरोना व्हेरिएंटच्या अफवांकडे लक्ष देऊ नका, ABCD चे पालन करा; सरकारचा लोकांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 12:04 IST

Corona Virus : कोरोना व्हायरसच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंटबाबतच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. कोरोना व्हायरसविरूद्ध मूलभूत प्रोटोकॉलकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

नवी दिल्ली : देशासह जगभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर अद्याप सुरूच आहे. आता कोरोना व्हायरचा नवीन व्हेरिएंट समोर आल्याने लोकांची आणि सरकारची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत लोकांमध्ये अफवा पसरवू नये म्हणून केंद्र सरकारने लोकांसाठी आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंटबाबतच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. कोरोना व्हायरसविरूद्ध मूलभूत प्रोटोकॉलकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्या ट्विटर कोविड-19 हँडलवरून यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यामध्ये लोकांना सांगितले गेले आहे की, ' कोरोना व्हायरसच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंट संबंधित असलेल्या अफवाकडे दुर्लक्ष करा, त्याऐवजी कोरोना व्हायरच्या महामारीविरोधात एबीसीडी नियमांचे पालन करा.'

मंत्रालयाने एबीसीडीचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार, ए म्हणजे - एडव्हाइज किंवा सल्ला, बी म्हणजे बिलिव्ह किंवा विश्वास, सी म्हणजे - क्रॉस चेक, याचच अर्थ कोणत्याही माहितीची पुन्हा पडताळणी करणे आणि डी म्हणजे डू नॉट प्रमोट म्हणजेच भितीचे वातावरण पसरू नका. यासह, मंत्रालयाने एका ग्राफिक्सद्वारे काही सूचना शेअर केल्या आहेत. हे कोरोना संकट काळात लोकांना खूप मदत करू शकते. 

मोदींचे अफवांपासून दूर राहण्याचे आवाहनयापूर्वी 27 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लोकांना कोरोना व्हायरसबाबच्या अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. कोरोना व्हायरस जागतिक महामारी संपली आहे, हे समजून घेण्याची चूक करू नये असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिला होता. कोरोना व्हायरस आपले स्वरुप बदलतो, म्हणूनच याला रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोरोना व्हायरसशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन करणे आणि लसीकरण करणे आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. तसेच, लोकांचा गोंधळ होऊ नये आणि अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस