शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

Corona virus : कामगारांचा पगार कापू नका, व्यापारी अन् उच्च वर्गीयांना मोदींचं भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 21:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सर्वसामान्य नागरिकांपासून ते वैद्यकीय क्षेत्रात आणि कोरोनाशी दोनहात करणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या कामगिरीला स्पर्श केला

मुंबई - जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. या महासंकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज असून कोरोनाला टक्कर देणाऱ्या प्रत्येक भारतीयांचे मोदींनी आभार मानले. तसेच, या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही सूचवले आहे. रविवार 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत देशात जनता कर्फ्यु लागू करुन नागरिकांनी जगाला एकजुटीचा संदेश द्यावा, असे आवाहनही मोदींनी केले. 

पंतप्रधाननरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सर्वसामान्य नागरिकांपासून ते वैद्यकीय क्षेत्रात आणि कोरोनाशी दोनहात करणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या कामगिरीला स्पर्श केला. देशाप्रती सर्वांची कृतज्ञता पाहून कौतुक करत, आभारही मानले. तर, देशावरील हे संकट सर्वांनी एकत्र येऊन हाताळायचे असल्याचं मोदींनी म्हटलं. यावेळी, गरिब आणि मजदूर वर्गांच्या आर्थिक हितासाठी आवाहनही केलंय.देशातील व्यवसायिक, व्यापारी, लहान-मोठे दुकानदार आणि लहानसहान संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पगारी कापू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. माणूसकीच्या नात्यातून या गंभीर परिस्थिताचा सामना आपल्याला करायचा आहे. त्यामुळे, कोरोनाच्या लढाईत देशासाठी आपलं योगदान द्यावे, असेही मोदींनी म्हटले. 

 

देशातील उच्चवर्गीय नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोदींनी आवाहन केलं आहे. आपण, सर्वसामान्य नागरिकांकडून ज्या ज्या सेवा घेता, त्यांना या संकटसमयी सुट्टी द्यावी. विशेष म्हणजे या नागरिक, कामगार आणि गरिब सेवाकरी व्यक्तींच्या आर्थिक हिताचाही विचार करावा. या काळात आपण सेवा खंडित केली म्हणून या कामगारांच्या पगारीत कपात करू नका, असा माझा आग्रह असल्याचे मोदींनी म्हटले. ज्याप्रमाणे तुम्हाला मला घरं चालवायचं आहे, तसेच या सेवा देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही आपलं घर चालवायचं असतं. त्यामुळे व्यापारी, उच्च वर्गीय व्यक्ती आणि लहान-मोठ्या संस्थांनी कंपनीत सेवा देणाऱ्यांचे वेतन न कापण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानHealthआरोग्य