CoronaVirus : सरकारला खरच लशीची आवश्यकता आहे का? की...? प्रश्न विचारणाऱ्याला आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 11, 2020 04:20 PM2020-10-11T16:20:26+5:302020-10-11T17:20:00+5:30

हषवर्धन म्हणाले, लस तयार व्हायला मोठा काळ लागतो. तसेच, लस उपलब्ध होण्यासंदर्भात कुठलीही अधिकृत तारीख सांगितलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (health minister harsh vardhan)

corona virus Covid-90 vaccine really needed or not health minister harsh vardhan answers | CoronaVirus : सरकारला खरच लशीची आवश्यकता आहे का? की...? प्रश्न विचारणाऱ्याला आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

CoronaVirus : सरकारला खरच लशीची आवश्यकता आहे का? की...? प्रश्न विचारणाऱ्याला आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

Next
ठळक मुद्देलवकर लस मिळावी यासाठी, केवळ भारतच नाही, तर जगभरात सरकारी आणि खासगी भागिदाऱ्या झ्याल्या आहेत.  लशीची आवश्यकता ज्याला सर्वप्रथम असेल, त्याला ही लस सर्वप्रथम मिळेल. सरकार कोरोना लशीसंदर्भात पारदर्शक नीती तयार करत आहे.

नवी दिल्‍ली - कोरोना व्हायरसवरील लशीसंदर्भात भारत सरकार कुठल्याही प्रकारची खोटी घोषणा करत नही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. ते 'संडे संवाद' कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना विचारण्यात  आले, की 'लशीसंदर्भात सरकारने आधी 15 ऑगस्‍ट तारीख सांगितली. नंतर, 2020च्या अखेरपर्यंत येईल, असे म्हटले. सरकार अशा प्रकारच्या घोषणा लोकांना केवळ रमवण्यासाठी करत आहे का?' यावर हषवर्धन म्हणाले, लस तयार व्हायला मोठा काळ लागतो. तसेच, लस उपलब्ध होण्यासंदर्भात कुठलीही अधिकृत तारीख सांगितलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकार बिल गेट्स यांचा अजेंडा चालवत आहे का?
कोरोना लस टोचण्याची सक्ती करून सरकार बिल गेट्स यांचा अजेंडा तर पुढे नेत नाही? असा प्रश्न एका व्यक्तीने हर्षवर्धन यांना विचारला. एवढेच नाही, तर सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) बिल गेट्स फाउंडेशनसोबत टाय-अप केल्यावरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. 'आपल्याकडे मृत्‍यू-दर एवढा कमी असताना, खरच सरकारला लशीची आवश्यकता आहे का? की ते केवळ बिल गेट्स यांचा अजेंडाचा चालवत आहेत?' असा सवालही त्या व्यक्तीने केला. यावर उत्तर देताना हर्षवर्धन म्हणाले, 'केवळ प्रभावी लसच एखाद्या आजाराला रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. यामुळे लवकर लस मिळावी यासाठी, केवळ भारतच नाही, तर जगभरात सरकारी आणि खासगी भागिदाऱ्या झ्याल्या आहेत. 

हर्षवर्धन यांच्या मतदार संघातील कोलांना मिळणार प्राधान्य?
यावेळी एक व्यक्ती रोशन सिंह यांनी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना प्रश्न केला, की त्यांच्या मतदारसंघातील लोकांना लस देण्यात प्राधान्य दिले जाईल? यावर हर्षवर्धन म्हणाले, मी केवळ माझ्या मतदारसंघाचाच आरोग्यमंत्री नाही, तर देशाचा आरोग्यमंत्री आहे. मी स्पष्ट करतो, की सरकार यासंदर्भात पारदर्शक नीती तयार करत आहे. या लशीची आवश्यकता ज्याला सर्वप्रथम असेल, त्याला ही लस सर्वप्रथम मिळेल. मग तो माझ्या मतदारसंघातील असो अथवा नसो.

Web Title: corona virus Covid-90 vaccine really needed or not health minister harsh vardhan answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.