शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 22:11 IST

Corona virus : केंद्र सरकारने कोरोना महमारीशी लढ देत असलेल्या राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने कोरोना महमारीशी लढ देत असलेल्या राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन देण्यात येणार आहे

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील ऑक्सिजनची वाढती मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसिविर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या होत्या. त्यानंतर, आता केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्राधान्य देत सर्वाधिक ऑक्सिजन देऊ केले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली.  

केंद्र सरकारने कोरोना महमारीशी लढ देत असलेल्या राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर झाला आहे. उत्तरप्रदेश 800 मेट्रिक टन तर राजधानी दिल्लीला 350 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन देण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली. केंद्र सरकारने 12 राज्यांशी कोरोना परिस्थितीवर बैठक घेतल्यानंतर विविध अत्यावश्यक असलेलं साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये, 6,177 मेट्रीक टन ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे.  ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेने करण्याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रकाशित केले होते. त्यानंतर, आता ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात स्वत: रेल्वेमंत्र्यांनीच माहिती दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कालच देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील माहिती देताना टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली.  रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळे राज्यातील स्थानिक औषध उत्पादक कंपन्यांना त्याच्या उत्पादनासाठी तांत्रिक सहकार्य आणि परवानगी देण्यासाठी विधि व न्याय विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. कोरोना विषाणूची जनुकीय संरचना बदलली का, याच्या तपासणीसाठी महाराष्ट्रातील काही नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यातील १,१०० पैकी ५०० नमुन्यांची तपासणी झाली असून, सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडून लवकरच दिला जाणार आहे. सर्वांत जास्त संसर्ग करण्याची क्षमता या विषाणूत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpiyush goyalपीयुष गोयलChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्र