शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

Corona Virus: पाच राज्यांनी चिंता वाढवली;  'पुढील तीन महिने सणांचे, लोकांनी सतर्क राहावे', आरोग्य मंत्रालयाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 7:28 PM

Corona Virus: देशातील एकूण पॉझिटिव्हिटी रेट मागील आठवड्यात 1.68% होता, तर यापूर्वी हा 5.86% होता, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाबतची (corona virus)आव्हाने अद्याप संपलेली नाहीत. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक या पाच राज्यात कोरोनाचे 10 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत, असे आरोग्य मंत्रालय म्हटले आहे. तसेच, सरकारने दावा केला आहे की, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जवळपास 5 लाख ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत. (corona virus case update health ministry pc kerala contributing 5 lakh oxygen beds in india across states)

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशातील कोरोनाबाबतचे आव्हान अद्याप संपलेले नाही. काही प्रमाणात, आम्ही म्हणतो की आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. आपल्याला कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची गरज आहे. 5 राज्ये (केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक) जिथे 10,000 पेक्षा जास्त सक्रिय प्रकरणे आहेत.

देशातील एकूण पॉझिटिव्हिटी रेट मागील आठवड्यात 1.68% होता, तर यापूर्वी हा 5.86% होता, असे लव अग्रवाल यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले की, अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील काही जिल्ह्यांसह 28 जिल्हे आहेत, ज्यात पॉझिटिव्हिटी रेट 5% ते 10% दरम्यान आहे, म्हणजे उच्च संसर्ग दर. तर 34 जिल्हे असे आहेत, जिथे आठवड्याचा पॉझिवटिव्हिटी रेट 10% पेक्षा जास्त आहे.

8.36 लाख बेड तयारआरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीविषयी सांगितले की, राज्यांमध्ये 8.36 लाख हॉस्पिटल बेड तयार करण्यात आले आहेत. 9.69 लाख आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत. देशभरात 4.86 लाख ऑक्सिजन बेड आहेत. त्याचप्रमाणे 1.35 लाख आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत. डॉ व्ही के पॉल म्हणाले की, सरकार दररोज 4.5 ते 5 लाखांपर्यंतच्या प्रकरणांची तयारी करत आहे. पहिला डोस 71% लसीकरणापर्यंत पोहोचल्यानंतर कोणत्या प्रकारची प्रकरणे वाढतील, याची गणना करण्यासाठी आपल्याकडे कोणताही सरळ फॉर्म्युला नाही आहे.

देशभरात 2.44 लाख सक्रिय प्रकरणेआरोग्य सचिव म्हणाले की, आतापर्यंत देशात कोरोनाची 3.39 कोटी प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर सध्या देशभरात 2.44 लाख सक्रिय प्रकरणे आहेत. देशभरात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे, परंतु केरळमध्ये अजूनही जास्त कोरोना रुग्ण असल्याचे समोर येत आहे. कोरोना प्रकरणांमध्ये, केरळमध्ये सर्वाधिक 50% पेक्षा जास्त प्रकरणांची नोंद होत आहे, तर महाराष्ट्र 15.06%, तामिळनाडू 6.81% आणि मिझोरम 6.58% प्रकरणे समोर येत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या मते,  5% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या राज्यांमध्ये मिझोरम आघाडीवर आहे. मिझोरममध्ये 21.64% आणि केरळमध्ये 13.72% पॉझिटिव्हिटी रेट आहे. त्यानंतर सिक्कीम, मणिपूर आणि मेघालयचा नंबर लागतो.

आतापर्यंत  92.77 कोटी डोस आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिव म्हणाले की, आतापर्यंत भारतात 92.77 कोटी डोस देण्यात आले आहेत. पहिल्या डोस कव्हरेजची राष्ट्रीय सरासरी आता 71 टक्के आहे. लक्षद्वीप, चंदीगड, गोवा, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये सर्वांना पहिला डोस देण्यात आला. तसेच, आरोग्य मंत्रालयाने लोकांना सणासुदीच्या काळात अधिक सावधगिरी बाळगण्याचा इशारा देताना सांगितले की, भारत सरकार म्हणते की ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर हे सणांचे महिने आहेत आणि या काळात लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.  सणासुदीच्या काळात लोकांनी सावध राहावे, असा इशारा मंत्रालयाने दिला आहे. मास्क घालणे खूप महत्वाचे आहे. लसीकरण हे एका ढालीसारखे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य