शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

Corona vaccine: जवळच्या केंद्रात लस आहे की नाही? आता व्हॉट्सऍपवर समजणार, सरकारने जारी केला नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 15:42 IST

Corona vaccination in India: सर्वसामान्यांपर्यंत सुलभतेने लस पोहोचावी यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

नवी दिल्ली - कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्यांपर्यंत सुलभतेने लस पोहोचावी यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (Coronavirus) त्यात आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आरोग्य मंत्रालयाने एक मोबाईल नंबर प्रसिद्ध केला आहे. या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही तुमच्या परिसरात असलेल्या लसीकरण केंद्रात लस उपलब्ध आहे की नाही? याची माहिती मिळवू शकता. (Corona vaccination in India)

आरोग्य मंत्रालयाने ९०१३१५१५१५ हा क्रमांक प्रसिद्ध केला आहे. जवळपासच्या लसीकरण केंद्रात लस उपलब्ध आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी तुम्हाला या क्रमांकावर केवळ एक मेसेज करवा लागेल,  व्हॉट्सऍपवर या क्रमांकावर जाऊन तुम्हाला तुमच्या भागाचा पिन कोड टाइप करून सेंड करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या भागात असलेल्या लसीच्या उपलब्धतेबाबत अधिकृत माहिती मिळेल. 

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यामुळे लस घेण्यासाठी फार त्रास घ्यावा लागणार नाही. तसेच अनावश्यकपणे वारंवार कुठल्याही सेंटरवरही जावे लागणार नाही. जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा तुम्ही एकवेळ लसीबाबत अवश्य अपडेट घ्या. त्यानंतर लसीकरण केंद्रात जाऊन कोरोनावरील लस घ्या. 

दरम्यान कोरोना चाचणीबाबतही आयसीएमआरने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत आयसीएमआरने दिलेल्या सल्ल्यानुसार आता कोरोनाची चाचणी घरामधूनही करता येणार आहे. यासाठी रँपिड अँटिजन टेस्टसाठीच्या एका किटला आयसीएमआरकडून परवानगी मिळाली आहे. या किटच्या माध्यमातून लोक घरामध्येच नाकाच्या माध्यमातून कोरोना चाचणीसाठी सँपल घेऊ शकतील.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्य