शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

Corona vaccine : सीरम दहमहा १० कोटी, तर भारत बायोटेक ७.८ कोटी लसींचे उत्पादन करणार, लसींची टंचाई दूर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 23:05 IST

Corona vaccine News: देशात वाढत्या मागणीमुळे लसींचे उत्पादन कमी पडत असल्याने कोरोनाविरोधातील लसींची टंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाबाबत दिलासा देणारी माहिती आज समोर आली आहे.

नवी दिल्ली - एकीकडे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग मात्र म्हणावा तसा वाढलेला नाही. त्यातच आता देशात वाढत्या मागणीमुळे लसींचे उत्पादन कमी पडत असल्याने कोरोनाविरोधातील लसींची टंचाई निर्माण झाली आहे. (Corona vaccine News) त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाबाबत दिलासा देणारी माहिती आज समोर आली आहे. सीरम इंस्टिट्युट आणि भारत बायोटेक या भारतातील कोरोनाविरोधातील लसींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी लसींच्या उत्पादनाबाबतचा अहवाल केंद्र सरकारला एक अहवाल दिला आहे. (Serum 10 crore per month, while India Biotech will produce 7.8 crore vaccines, vaccine shortage will be end)

या अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार सीरम इन्स्टिट्युटने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत किंवा सुरुवातीपासून दरमहा १० कोटी कोविशिल्ड लसी उत्पादित करणार असल्याचे सांगितले आहे. तर भारत बायोटेकची उत्पादन क्षमताही वाढणार असून, कोव्हॅक्सिनची निर्मिती करणारी ही कंपनी दरमहा ७.८ कोटी लसींचे उत्पादन करणार आहे.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य मंत्रालय आणि ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या दोन्ही लसनिर्मात्या कंपन्यांकडे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या उत्पादनाबाबतची माहिती मागितली होती. त्याला प्रत्युत्तरदाखल दोन्ही कंपन्यांनी लसींचे उत्पादन वाढवण्याबाबत माहिती दिली.  भारत बायोटेकचे संचालक व्ही. कृष्ण मोहन यांनी सरकारला सांगितले की, जुलै महिन्यामध्ये कोव्हॅक्सिनचे उत्पादन ३.३२ कोटी आणि ऑगस्ट महिन्यात ७.८२ कोटी रुपये होईल. तर सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियामध्ये सरकार आणि नियामक बाबतचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी सांगितले की, कोविशिल्डचे उत्पादन ऑगस्ट महिन्यात १० कोटी लसींचे उत्पादन होईल आणि सप्टेंबर महिन्यात ते अधिक वाढेल.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत