शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
5
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
6
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
7
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
9
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
10
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
11
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
12
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
13
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
14
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
15
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
17
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
18
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
19
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
20
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली

Corona Vaccine: लसीचा दुसरा डोस दोन महिन्यांनी; परिणामकारकता अधिक; केंद्राची राज्यांना पत्राद्वारे सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 3:19 AM

पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांचे न ठेवता ते वाढविण्यात यावे, अशी सूचना करणारे पत्र केंद्र सरकारने सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना पाठविले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक लसींच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांचे आहे. मात्र, यापैकी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर न देता सहा ते आठ आठवड्यांनी द्यावा, अशी सूचना केंद्र सरकारने सोमवारी सर्व राज्यांना केली. 

पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांचे न ठेवता ते वाढविण्यात यावे, अशी सूचना करणारे पत्र केंद्र सरकारने सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना पाठविले आहे. मात्र, कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर आहे तसेच ठेवण्याचे केंद्राने सुचविले आहे. 

शास्त्रीय पुराव्यांच्या आधारावर कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधील अंतराचा नॅशनल टेक्निकल ॲडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतील तज्ज्ञांचे पथक यांनी आढावा घेतला आहे.कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील सध्याचे २८ दिवसांचे अंतर वाढवून ते सहा ते आठ आठवड्यांचे केल्यास लसीची परिणामकारकता आणि सुरक्षा वृद्धिंगत होत असल्याचे या आढाव्यात आढळून आले. मात्र, दोन डोसमधील अंतर सहा ते आठ आठवड्यांपेक्षा अधिक नसावे, असे सरकारने पत्रात म्हटले आहे. 

तब्बल साडेचार कोटी लोकांना मिळाली लस१६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेचा १ मार्चपासून तिसरा टप्पा सुरू झाला असून, त्यात ६० वर्षे वयावरील कोणालाही तसेच सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील लोकांना लसींचे डोस देण्यात येत आहेत. आतापर्यंत साडेचार कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र, असे असूनही कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या वाढू लागली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस