शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: कोरोनाला मारा ‘गोळी’, फायझर तयार करणार रामबाण औषध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 08:38 IST

Corona Vaccine Update:  कोरोनाच्या दोन्ही लाटांनी एकूणच जगभरात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. मात्र, आता हळूहळू जग यातून सावरू लागले आहे. लसींचे उत्पादन आणि लसीकरण या दोन्हींचा वेग वाढला आहे.

 कोरोनाच्या दोन्ही लाटांनी एकूणच जगभरात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. मात्र, आता हळूहळू जग यातून सावरू लागले आहे. लसींचे उत्पादन आणि लसीकरण या दोन्हींचा वेग वाढला आहे. फायझरने आता कोरोनावर प्रभावी ठरू शकेल, अशी गोळीही बाजारात आणण्याचा घाट घातला आहे.  

 प्रोटीज इनहिबिटर म्हणजे? प्रोटीज इनहिबिटर एचआयव्ही आणि हेपेटायटिस सी यांच्यावरील उपचारासाठी वापरले जाते. शरीरात विषाणूची पुनर्निर्मिती होऊ नये, त्यास प्रतिबंध व्हावा यासाठी प्रोटीज इनहिबिटर उपयुक्त ठरते. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात फायझरने ‘पीएफ-०७२१३३२’ या नावाने मौखिक प्रोटीज इनहिबिटरच्या नैदानिक चाचण्या सुरू केल्या.  जूनमध्ये फायझरने या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले असून मौखिक प्रोटीज इनहिबिटर पाचपट परिणामकारक असल्याचे स्पष्ट केले.  जुलैमध्ये फायझरने या औषधाच्या  दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील  चाचण्यांना सुरुवात केली. 

काय आहे औषध?फायझरने बायोएन्टेकच्या साह्याने बीएनटी१६२बी२ नावाची कोरोनाप्रतिबंधक लस तयार केली.  आता फायझर  कोरोनावर प्रभावी ठरू शकेल असे औषध बनविण्याच्या तयारीत आहे.  प्रोटीज इनहिबिटर  असे हे औषध असून ते विषाणूप्रतिरोधी आहे.  

कोरोनावर याचा काय उपयोग? फायझरच्या प्रोटीज इनहिबिटरला बाजारात प्रचंड मागणी येण्याची शक्यता आहे.  तोंडावाटे दिले जात असल्याने फायझरच्या पीएफ-०७३२१३३२ कोरोनाबाधितांसाठी अधिक उपयुक्त ठरू शकेल, असे अमेरिकी तज्ज्ञांचे मत आहे.  ज्यांना कोरोनाची बाधा होऊन गेली आहे आणि पूर्णत: लसीकरण झालेले नाही, अशांसाठी फायझरची ही ‘गोळी’ अधिक परिणामकारक ठरणार आहे.   वर्षअखेरपर्यंत या गोळीला अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाची मंजुरी मिळेल, असा विश्वास फायझर कंपनीला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य