Corona vaccine : केंद्रसरकारनं सीरम इंस्टिट्यूटला दिली नवीन आर्डर; वर्ष अखेरपर्यंत मिळणार 66 कोटी डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 11:59 AM2021-09-10T11:59:42+5:302021-09-10T12:02:05+5:30

पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने आपली लस निर्मिती क्षमता वाढविली आहे. आता कंपनी दर महिन्याला 20 कोटी कोविड-19 कोविशील्ड लसी तयार करू शकते.

Corona vaccine Centre place new order of covishield for 66 crore dose | Corona vaccine : केंद्रसरकारनं सीरम इंस्टिट्यूटला दिली नवीन आर्डर; वर्ष अखेरपर्यंत मिळणार 66 कोटी डोस

Corona vaccine : केंद्रसरकारनं सीरम इंस्टिट्यूटला दिली नवीन आर्डर; वर्ष अखेरपर्यंत मिळणार 66 कोटी डोस

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारने गुरुवारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबरच ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनेका कोविड -19 लस कोविशील्डच्या 66 कोटी डोसच्या खरेदीसाठी नवी ऑर्डर दिली आहे. सरकार आणि सीरम इस्टिट्यूटचे रेग्युलेटरी डायरेक्टर प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सांगितले आहे, की सीरम इंस्टिट्यूट या महिन्याच्या अखेरपर्यंत 20.29 कोटी कोविशील्ड लसींचा पुरवठा करण्यास सक्षम आहे. 

आता दर महिन्याला होते 20 कोटी डोसचे उत्पादन -
पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने आपली लस निर्मिती क्षमता वाढविली आहे. आता कंपनी दर महिन्याला 20 कोटी कोविड-19 कोविशील्ड लसी तयार करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जुलै महिन्यात भारत बायोटेकला लसीच्या 28.50 कोटी डोसची ऑर्डर दिली होती. मात्र, भारत बायोटेक आतापर्यंत ही ऑर्डर पूर्ण करू शकलेली नाही. 

कोविशील्ड घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी...! माकडांवर केलेल्या प्रयोगातून समोर आली खास माहिती

सरकारने 12 मार्चला दिलेल्या ऑर्डरनुसार, भारत बायोटेक कोव्हॅक्सीनचे पाच कोटी डोस देण्याच्या जवळपास आहे. तसेच, आरोग्य मंत्रालयाने ऑगस्ट ते डिसेंबर या काळात कोविशील्डच्या 37.50 कोटी डोसची ऑर्डर सीरम इंस्टिट्यूटला दिली होती. ही ऑर्डर कंपनी याच महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण करू शकते.

देशात 31 ऑगस्टरोजी कोरोना लसीचा आकडा 65 कोटींच्याहू पुढे होता. यासंदर्भात नीती आयोगाच्या आरोग विषयाशी संबंधित सदस्य डॉ. व्ही के पॉल आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सेक्रेटरी राजेश भूषण म्हणाले, एकट्या सीरम इंस्टिट्यूटने कोविशील्ड लसींच्या 60 कोटी डोसचा सप्लाय केला आहे. यात जानेवारी महिन्यात 2.1 कोटी डोस, फेब्रुवारीमध्ये 2.5 कोटी, मार्चमध्ये 4.73 कोटींहून अधिक, एप्रिलमध्ये 6.25 कोटींहून अधिक, मेमध्ये 5.96 कोटींपेक्षा जास्त, जूनमध्ये 9.68 कोटींपेक्षा अधिक डोसचा पुरवठा झाला आहे. याशिवाय जुलै महिन्यात 12.37 कोटींहून अधिक ऑगस्टमध्ये 16.92 कोटींहून अधिक लसींचे डोस दिले गेले.

मस्तच! आता तर कोविशील्ड लस घेतलेल्यांची चिंताच मिटली! नव्या अभ्यासातून समोर आली आनंदाची बातमी
 

Web Title: Corona vaccine Centre place new order of covishield for 66 crore dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.