शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
3
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
4
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
5
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
6
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
7
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
8
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
9
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
10
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
11
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
12
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
13
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
14
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
15
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
16
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
17
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
18
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
19
शांततेचे दूत! ट्रम्प यांच्यासाठी शाहबाज शरीफ यांच्याकडून नोबेलची मागणी; मेलोनींनी तोंडावर ठेवला हात
20
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!

Corona vaccine: कोरोनाविरोधातील लस घेणार का? बाबा रामदेव यांनी असे उत्तर दिले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 09:17 IST

Baba Ramdev News: आयुर्वेदाचा पुरस्कार करणाऱ्या बाबा रामदेव यांना कोरोनाविरोधातील लस घेणार का अशी विचारणा करण्यात आली होती. तेव्हा ते म्हणाले की...

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाचा योगगुरू बाबा रामदेव यांच्या वक्तव्यांमुळे होमिओपॅथी विरुद्ध अ‍ॅलोपॅथी असा वाद सुरू झाला होता. दरम्यान, आता बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी कोरोना लसीबाबत मोठे विधान केले आहे. आयुर्वेदाचा पुरस्कार करणाऱ्या बाबा रामदेव यांना कोरोनाविरोधातील लस घेणार का अशी विचारणा केली असता त्यांनी कोरोनावरील लस घेणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून देशातील प्रत्येक राज्यामध्ये १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधानांनी उचललेल्या या पावलामध्ये मीसुद्धा भागीदार होणार आहे. ( Baba Ramdev said I will also get vaccinated against corona)

बाबा रामदेव यांनी सांगितले की, मी लवकरच कोरोनावरील लस घेणार आहे. मात्र आपल्या जीवनात योग आणि आयुर्वेदाचा समावेश केला पाहिजे. योग हा आजारपणांसमोर एखाद्या ढालीप्रमाणे आहे. योग कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीपासून रक्षण करतो. मात्र शस्त्रक्रिया आणि आणीबाणीच्या परिस्थितीत अ‍ॅलोपॅथी ही सर्वश्रेष्ठ उपचार पद्धती आहे. माझा कुठल्याही  संघटनेला तसेच उपचारपद्धतीला विरोध नाही. माझी लढाई तर ड्र्ग माफियांविरोधात आहे. चांगले डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूतांप्रमाणे आहेत. मात्र अनावश्यक औषधे आणि उपचारांच्या नावाखाली कुणाचेही शोषण करता कामा नये. यावेळी बाबा रामदेव यांनी पंतप्रधान जनऔषधी केंद्रांचेही कौतुक केले. केंद्र सरकारने उचललेल्या या पावलामुळे लोकांना कमी खर्चात जेनेरिक औषधे सहजपणे उपलब्ध करता येतील. गेल्या काही दिवसांपासून आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यात अ‍ॅलोपॅथीवरून वाद सुरू आहे. हल्लीच बाबा रामदेव यांनी डॉक्टरांबाबत काही वादग्रस्त विधाने केली होती. त्यानंतर आयएमएशी संबंधित डॉक्टरांनी रामदेव बाबांवर आक्षेप घेतला होता. मात्र बाबा रामदेव यांनी आपल्या विधानांवर स्पष्टीकरण देताना याबाबत खेद व्यक्त केला होता. दरम्यान रामदेव बाबांच्या या मुक्ताफळांनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही त्यांना पत्र लिहून त्यांनी केलेल्या विधानांवर आक्षेप घेतला होता. तसेच बाबा रामदेव यांच्या विधानांविरोधात अनेक शहरांमध्ये तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यmedicinesऔषधं