Corona Vaccination: स्पुतनिक लाइट एका डोसची लस भारतात मिळणार सप्टेंबरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 06:34 AM2021-08-14T06:34:05+5:302021-08-14T06:34:21+5:30

लसीची किंमत साडेसातशे रुपये असणार

Corona Vaccination Sputnik light single dose vaccine will be available in India in September | Corona Vaccination: स्पुतनिक लाइट एका डोसची लस भारतात मिळणार सप्टेंबरमध्ये

Corona Vaccination: स्पुतनिक लाइट एका डोसची लस भारतात मिळणार सप्टेंबरमध्ये

Next

नवी दिल्ली : स्पुतनिक लाइट ही एका डोसची व रशियन बनावटीची कोरोना प्रतिबंधक लस भारतामध्ये येत्या सप्टेंबर महिन्यापासून उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या लसीची किंमत साडेसातशे रुपये असणार आहे. ही लस पेनेशिया बायोटेक कंपनी भारतात आणणार आहे.

देशात सुरू असलेली कोरोना लसीकरण मोहीम अधिक गतिशील करण्यासाठी स्पुतनिक लाइट खूप उपयोगी ठरणार आहे. या लसीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी पेनेशिया बायोटेकने औषध महानियंत्रकांकडे नुकताच अर्ज सादर केला. पहिल्या टप्प्यात स्पुतनिक लाइट लसीचा पुरवठा थोड्या कमी प्रमाणात उपलब्ध होईल.  कोरोनाच्या सर्व नव्या प्रकारच्या विषाणूंविरोधात ही लस ८० टक्के प्रभावी असल्याचा दावा रशियाने केला आहे. स्पुतनिक लाइट भारतात उपलब्ध करून देण्यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेशी पेनेशिया बायोटेकने करार केला आहे. 

Web Title: Corona Vaccination Sputnik light single dose vaccine will be available in India in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.